लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ ्रप्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. या व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघांचीही संख्या मोठी आहे. परंतु, सध्या अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने वन्यप्राण्यांची भटकंती होऊ नये या उद्देशाने तीन टँकरच्या सहाय्याने वन्यप्राण्यांच्या अधिवासात असलेल्या तब्बल ७३ कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी ठाकले जात आहे. यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे.बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत समाविष्ट बोरधरण वन्यजीव परिक्षेत्रात ३२ व नवीन बोर वन्यजीव परिक्षेत्रात ४१ असे एकूण ७३ पाणवठे जंगलातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. त्यापैकी १४ पाणवठ्यांवर सौर उर्जेचा वापर करून नियमित पाणी भरले जाते. तर दोन पाणवठ्यांमध्ये विद्युत मोटारीच्या सहाय्याने पाणी टाकले जाते. शिवाय उर्वरित ५८ कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे. त्यासाठी तीन ट्रॅक्टर टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांच्या अधिवासात असलेल्या प्रत्येक पाणवठ्याची दिवसातून दोन वेळा वनरक्षकाद्वारे तर दिवसातून एकदा क्षेत्रसहाय्यकाकडून पाहणी केली जाते. सर्व पाणवठ्यांमध्ये दररोज पाणी भरल्या गेले काय याची माहिती आवजून आपल्या सहकार्यांकडून जाणून घेतात. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठीची भटंती थांबली आहे.
बोर व्याघ्रच्या वन्यप्राण्यांना टँकरचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:17 PM
देशातील सर्वात छोटा व्याघ ्रप्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. या व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघांचीही संख्या मोठी आहे. परंतु, सध्या अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने वन्यप्राण्यांची भटकंती होऊ नये या उद्देशाने तीन टँकरच्या सहाय्याने वन्यप्राण्यांच्या अधिवासात असलेल्या तब्बल ७३ कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी ठाकले जात आहे.
ठळक मुद्देतीन टँकरद्वारे नियमित भरली जातात ७३ कृत्रिम पाणवठे