लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जंगलव्याप्त परिसर म्हणून आर्वी, आष्टी, कारंजा व सेलू तालुक्याची ओळख आहे. याच परिसरात वाघ, अस्वल, मोर, हरिण, रोही आदी वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सध्या भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावल्याने आणि अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने सध्या टँकरच्या सहाय्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे. वनविभागाकडून केली गेलेली ही सोय वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी मदतगारच ठरत आहे.यंदा वनविभागाने जिल्ह्यातील विविध भागात तब्बल १५० कृत्रिम पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांच्या अधिवासात त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. असे असले तरी रोही, हरिण, माकड, नीलगाय आदी झाडांची पाने खाऊन जगणारे वन्यप्राणी जंगलात मुबलक प्रमाणात चारा नसल्याने शेतशिवारांकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर काही हिंसक पाण्याच्या शोधार्थ शेतशिवारांकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यात संघर्ष होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही कृत्रिम पाणवठ्यांच्या आवारातच वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्यासह मुबलक प्रमाणात चारा कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तशी वन्यजीप्रेमींची मागणीही आहे. सध्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठाही केला जात आहे. ज्या पद्धतीने मनुष्यासाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्याच पद्धतीने सध्या वनविभागाच्यावतीने वन्यप्राण्यांच्या अधिवासात टँकरद्वारे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. असे असले तरी आर्वी आणि खरांगणा या भागातील जंगलातील अनेक नैसर्गिक पाणवठे आटल्याने आणि काही कृत्रिम पाणवठ्यांच्या बोअरवेलने तळ गाठल्याने खासगी टँकर लावून कृत्रिम पाणवठे पाण्यानी भरली जात आहे. त्यामुळे मनुष्यासह वन्यप्राण्यासाठी टँकरने होणारा पाणी पुरवठा मदतगार ठरत आहे.मार्च अखेरीस दिला मोबदलाखरांगणा वन परिक्षेत्रात एकूण १६ कृत्रिम पाणवठे असून येथे पीपल फॉर अॅनिमल्सच्या सहकार्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नि:शुल्क पाणी टाकले जात आहे. इतकेच नव्हे, तर याच वनपरिक्षेत्रातील बोअरवेल असलेल्या सहा कृत्रिम पाणवठ्यांपैकी तीन बोअरवेल असलेल्या कृत्रिम पाणवठ्यांच्या आवारातील बोअरवेलने तळ गाठल्याने एका खासगी टँकरच्या सहाय्याने पाणवठ्यांमध्ये पाणी भरले जात आहे. मार्च अखेरीस सुमारे १० हजारांचे देयक टँकर मालकाला देण्यात आले आहे. तर आर्वी वनपरिक्षेत्रात सात नैसर्गिक पाणवठे आणि पाच कृत्रिम पाणवठे आहेत. त्यापैकी बोअरवेल असलेले तीन पाणवठे आहेत. मात्र, तेथेही पाणीटंचाई असल्याने एक खासगी टँकर लावण्यात आला आहे. याच टँकरच्या सहाय्याने सध्या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे. येथेही मार्च अखेरीस टँकर मालकाला देयक अदा करण्यात आले आहे.
तृष्णातृप्तीसाठी टँकर ठरताहेत मदतगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:00 PM
जंगलव्याप्त परिसर म्हणून आर्वी, आष्टी, कारंजा व सेलू तालुक्याची ओळख आहे. याच परिसरात वाघ, अस्वल, मोर, हरिण, रोही आदी वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सध्या भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावल्याने आणि अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने सध्या टँकरच्या सहाय्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे.
ठळक मुद्देआर्वी अन् खरांगणा वनपरिक्षेत्रात पाणीटंचाई