लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पवनार येथील धाम नदीपात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी भागातील डॉ. तळवेकर यांच्या रुग्णालयासमोर फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर पाणी वाहून गेले. याच जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम आता अंतिमटप्प्यात आले असून मुख्य जलवाहिनी फुटल्याच्या घटनेमुळे नागरिकांना तीन दिवस उशीराने नळ योजनेद्वारे वर्धा न.प. प्रशासन पाणी पुरवठा करणार असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकारी सांगितले.नालवाडी भागात मुख्य जलवाहिनी सोमवार ६ मे रोजी अचानक फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर स्वच्छ पाणी वाहून गेले. सदर घटना लक्षात येताच वर्धा न.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने युद्धपातळीवर जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेऊन ते पूर्णत्त्वास नेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. सध्या हे दुरूस्तीचे काम अंतीम टप्प्यात आले असून दुरूस्तीचे काम शनिवारी सायंकाळी उशीरापर्यंत पूर्णत्त्वास जाणार आहे. दुरूस्तीचे काम अवघ्या दोन दिवसात पूर्ण होईल असा अंदाज असताना त्याला सहा दिवसांचा कालावधी लागत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच न.प.द्वारे केल्या जाणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून वर्धा शहरातील ज्या भागातील नळांना रविवारी पाणी येणार होते ते आता तीन दिवसानंतर येणार आहे. तसेच इतर भागातील नळालाही तीन दिवसा उशीरानेच पाणी येणार आहे. परिणामी, नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा, असे आवाहन वर्धा न.प.च्यावतीने करण्यात आले आहे.आठ टँकरद्वारे पाणीपुरवठामुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी समस्या भीषण रुप धारण करू पाहत होती. त्यावर मात करण्यासाठी न.प. प्रशासनाने सोमवारनंतर शहरातील काही भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. शुक्रवारी एकूण आठ टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात आला. एका टँकरने सुमारे चार फेऱ्या मारल्याची नोंद न.प.ने घेतली आहे.खंडित होणारा विद्युत पुरवठा ठरतोय डोकेदुखीशनिवारी वर्धा शहरातील काही भागातील नागरिकांना पाच टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु, खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. सध्या टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात असला तरी खासगी टँकरवर होणारा खर्च लाखाच्या आत कसा ठेवता येईल यावर पालिका प्रशासन लक्ष केंद्रीत करून आहे.
तीन दिवसानंतर येणार नळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:35 PM
पवनार येथील धाम नदीपात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी भागातील डॉ. तळवेकर यांच्या रुग्णालयासमोर फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर पाणी वाहून गेले.
ठळक मुद्देजलवाहिनी फुटल्याचा परिणाम। दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात