लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टा.) : येथून वर्धेकडे जाणाºया मार्गावरील सुलतानपूर चौरस्ता परिसरातील रस्त्यावरील डांबरच उखडले आहे. त्यामुळे मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळत आहे. नुकतेच या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली होती. परंतु, अल्पावधीतच रस्त्यावरील डांबर निघाल्याने गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. सदर प्रकराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.अल्पावधीत रस्त्यावरील डांबरच खरडून गेले आहे. ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्डा सहज दिसत नाही. रस्त्यावरील खड्डे चुकविण्यासाठी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांना जीव मुठीत घेलून या मार्गाने ये-जा करावी लागत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्याची व निकृष्ट दर्जाचे काम करणाºयांवर कार्यवाही करण्याची मागणी या भागातील नागरिकांची आहे.सेवाग्राम-हमदापूर मार्गावर खड्ड्यांची शर्यतसेवाग्राम : सेवाग्राम -हमदापूर मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहन चालकांचा जीव टांगणीला लागला आहे. खड्ड्यामुळे मानीचे, पाठीचे विकार नागरिकांना जडत आहेत. तसेच या मार्गावरील प्रवास सध्या खड्ड्यांमुळे जीवघेणा ठरत आहे.सेवाग्राम ते हमदापूर हे १७ कि़मी.चे अंतर आहे. परंतु, या रस्त्यावर खड्ड्यांची शर्यतच अनुभवायला मिळते. या मार्गावर अनेक महत्वपूर्ण गावे असून नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या मार्गावरील खड्डे बुजविणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची परिसरात ओरड आहे. या भागातील विविध कामासाठी नागरिकांना व शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात यावे लागते. वाहनचालकांना रात्रीच्या सुमारास रस्त्यावरील खड्डे सहज दिसत नसल्याने मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या मार्गाने जड वाहनांची वर्दळही बºयापैकी आहे. अवैध वाळूची वाहतूक करणारे याच मार्गाने ये-जा करतात. अवैध वाळूची वाहतूक करणाºयांवर कारवाई करावी व खड्डे बुजविण्याची मागणी आहे.
अल्पावधीत उखडले मार्गावरील डांबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:02 AM
येथून वर्धेकडे जाणाºया मार्गावरील सुलतानपूर चौरस्ता परिसरातील रस्त्यावरील डांबरच उखडले आहे. त्यामुळे मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळत आहे.
ठळक मुद्देचौकशी करून दोषींवर कारवाईची नागरिकांची मागणी