वर्धा पालिकेतील प्रकार : नागरी सुविधा केंद्रात कर भरणा करण्याचे आवाहनवर्धा : नागरिकांनी नियमित कराचा भरणा करावा, कर थकीत ठेवू नये यासाठी वर्धा नगर पालिकेद्वारे जनजागृती केली जात आहे. कर थकित असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन कर्मचारी नोटीस बजावत आहेत. पण ही संधी साधून पालिकेचे काही सेवानिवृत्त कर्मचारी सक्तीने करवसुली करीत असल्याचा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे यापासून सावध राहण्याचे आवाहन पालिकेद्वारे केले जात आहे . घराचा कर नियमित न भरणाऱ्या शहरातील नागरिकांवर आता नव्या शासकीय नियमानुसार अतिरिक्त दंड आकारला जात आहे. हा दंड रद्द करावा अशी मागणी होत असली तरी शासकीय नियमानुसार तो भरावाच लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा दंड टाळण्यासाठी कराचा भरणा नियमित आणि वेळेच्या आत करणे हा एकमात्र उपाय आहे. यासाठी वर्धा पालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करीत असतात. घरी पालिका कर्मचारी आल्यावर त्यांच्याजवळ नागरिकांना कराचा भरणा करता येतो. तशी रितसर पावतीही नागरिकांना दिली जाते. पण ही संधी साधून पालिकेचे काही सेवानिवृत्त कर्मचारी नागरिकांच्या घरी जाऊन सक्तीने करवसुली करीत नागरिकांची आणि नगरपालिकेची फसवणूक करीत आहे. नागरिकांनी पावतीची मागणी केली असता ती तुम्हाला नंतर मिळेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकही चक्राऊन गेले आहे. अनेकांसोबत असे प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. पण अद्याप कुठलीही लेखी तक्रार नसल्याने रितसर कारवाई करता येत नसल्याचे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रात जाऊनच नागरिकांनी कराचा भरणआ करावा व रितसर पावती घ्यावी, असे सांगण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)कर्मचारी आल्यास ओळखपत्र मागा !पालिकेने कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन कराचा नियमित भरणा करावा असे सांगत आहेत. अनेकांना नोटीसही बजावत आहेत. पण तोतया कर्मचारी फसवणूक करीत असल्याने नियमित कर्मचारी टिकेचे धनी होत आहे. त्यामुळे कर्मचारी घरी आल्यास आधी त्यास ओळखपत्र मागा असे आवाहन करण्यात आले आहे. लेखी तक्रार देण्याच्या सूचनापालिकेचे काही सेवानिवृत्त कर्मचारी आपण नियमित कर्मचारी असल्याची बतावणी करून सक्तीने करवसुली करीत असल्याच्या तोडी तक्रारी केल्या जात आहे. अशी फसवणूक झालेल्या नागरिकांनी रितसर लेखी तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. नागरी सुविधा केंद्रातच करचा भरणा करातोतया कर्मचाऱ्यांद्वारे सक्तीने करवसुली करण्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो नागरी सुविधा केंद्रातच कराचा भरणा करून ताबडतोब पावती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. घरी कर वसुली करण्यासाठी कुणीही कर्मचारी आल्यास त्यास आधी ओळखपत्र विचारावे. कर संग्रहकास कराची रक्कम पावती दिल्यानंतरचच देण्याच्या सूचनाही पालिकेद्वारे करण्यात आल्या आहे.काही सेवानिवृत्त कर्र्मचारी नागरिकांच्या घरी जाऊन पालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगत करवसुली करीत असल्याच्या घटना पुढे आल्या आहे. त्यामुळे नागरिकांनी यापासून सावध राहावे. कर्मचारी घरी आल्यास त्यास ओळखपत्रे विचारा. अशी फसवणूक झाली असल्यास आधी रितसर लेखी तक्रार करावी. आमच्या कार्मचाऱ्यांनाही नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना केल्या आहे. - अजय बागरे, प्रशासकीय अधिकारी, नगर परिषद वर्धा.
तोतया कर्मचाऱ्यांतर्फे करवसुली
By admin | Published: March 12, 2016 2:26 AM