आॅनलाईन लोकमतवर्धा : कमी वेळेत अधिक काम उत्कृष्टरित्या करणे संस्थात्मक वाटचालीत महत्त्वाचे असते. त्यातून केवळ संस्थेचाच विकास होत नाही तर स्वत:च्या क्षमताही वृद्धींगत होऊन व्यक्तिमत्वात भर पडते. त्यासाठीच आधुनिक काळात शिक्षकांनी वेळ व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे, असे मत मणिपाल येथील व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक शम्मी शिरी यांनी व्यक्त केले.भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद नवी दिल्लीद्वारे महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय सालोड येथे शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.कार्यशाळेचे उद्घाटन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवसीय कार्यशाळेत शम्मी शिरी, सुरत गुजरात येथील सॉफ्ट स्कील ट्रेनर हार्दिक पुरोहित, आयुर्वेद महा.चे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत वेळ व्यवस्थानासोबतच ताणतणाव नियोजन व आनंददायी जीवनावर मार्गदर्शन करण्यात आले.संचालन डॉ. अभिजीत गवई यांनी केले तर आभार डॉ. प्रज्ञा दांडेकर यांनी मानले. कार्यशाळेत अकोला, गोंदिया, वाशिम, नागपूर येथील आयुष महाविद्यालयांतून निवडक ५१ शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झाले होते. कार्यशाळेला पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. प्रसाद, डॉ. गौरव सावरकर आदींनी सहकार्य केले.
शिक्षकांनी वेळ व्यवस्थापनावर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:36 AM
कमी वेळेत अधिक काम उत्कृष्टरित्या करणे संस्थात्मक वाटचालीत महत्त्वाचे असते. त्यातून केवळ संस्थेचाच विकास होत नाही तर स्वत:च्या क्षमताही वृद्धींगत होऊन व्यक्तिमत्वात भर पडते.
ठळक मुद्देशम्मी शिरी शिक्षकांची कार्यशाळा