शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

साई मंदिरातील दानपेटी फोडली

By admin | Published: October 08, 2014 11:30 PM

दोन महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या विठ्ठल टेकडी कारंजा येथील साईमंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यानी अंदाजे ३ हजार रुपयांची रोकड आणि साईबाबाच्या डोक्यावरील

कांरजा (घाडगे) : दोन महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या विठ्ठल टेकडी कारंजा येथील साईमंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यानी अंदाजे ३ हजार रुपयांची रोकड आणि साईबाबाच्या डोक्यावरील ४०० ग्रॅम वजनाचा १२ हजार रुपये किंमतीचा चांदीचा मुकूट लंपास केला. ही घटना मंगळवारी भर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात भीतीचे वातवारण निर्माण झाले आहे. या मंदिराचे २८ आॅगस्ट २०१४ रोजी बांधकाम झाले. यात साईबाबाच्या मूर्तीची स्थापना झाली होती. त्याच वेळेला साईबाबांच्या डोक्यावर चांदीचा मुकूट चढविण्यात आला आणि भक्तांकडून दान स्विकारता यावे म्हणून दानपेटी ठेवण्यात आली. यास मंदिरात नियमित पुजारी आहे. घटनेच्या दिवशी पुजारी बिहारीलाल पांडे जेवणासाठी कारंजा शहरात गेला होते. नेमकी हीच संधी साधून चोरांनी डाव साधल्याचे बोलले जात आहे. या मंदिरात असलेल्या सीसी टिव्ही कॅमेऱ्यामुळे चोराचे अस्पष्ट चित्र मिळाले; पण त्यावरून चोर किती आणि कोण याचा अंदाज पोलिसांना घेता आला नाही. चोर तिघे होते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी एकाने परिसरात असलेल्या लहान मुलांना खेळण्यात गुंतविले व दोघांनी चोरी करून रोख रक्कम व चांदीचा मुकूट पळविला. या प्रकरणाची तक्रार कारंजा पोलिसात करण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र यातून काहीच निष्पन्न झाले नाही. या प्रकरणी ठाणेदार विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मंगेश कांबळे चौकशी करीत आहे. चोरी गेलेली रक्कम जास्त असावी अशी चर्चा आहे. भर दिवसा मंदिरात झालेल्या या चोरीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)