लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : स्वातंत्र्यांच्या यज्ञकुंडात प्राणाची आहुंती देणाऱ्या शहीदवीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहा हजार नागरिकांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करुन भावनांना वाट मोकळी करुन दिली. या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उरी सर्जिकल स्ट्राईकचे लेप्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार करण्यात आला.शहीद स्मृतीस्तंभावर सकाळी ११.३० वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचे आगमन झाले. त्यांनी मिल्ट्रीच्या बँड पथक सलामीने शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. त्यानंतर तालुका क्रीडा संकुलात आयोजित शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाला सुरूवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक भास्करराव ठाकरे सपत्नीक उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ना. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार दादाराव केचे, माजी खासदार विजय मुडे, तालुका निर्मितीचे प्रणेते श्रीधरराव ठाकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, जि.प.च्या समाजकल्याण सभापती नीता गजाम, नगराध्यक्ष जयश्री मोकदम, पंचायत समिती सभापती नीता होले, कारंजा पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, आर्वी पंचायत समिती सभापती शीला पवार, उपसभापती धर्मेंद्र राऊत, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक पारे, उपाध्यक्ष डॉ. किशोर गंजीवाले, राष्ट्रीय स्मृतीस्थळ अध्यक्ष डॉ. अरविंद मालपे, शहीद स्मृतिदिन कार्यक्रम समन्वयक राहुल ठाकरे, ले.जनरल राजेंद्र निंभोरकर यांची मंचावर उपस्थिती होती.यावेळी राहुल ठाकरे म्हणाले की, आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात रोजगाराचे साधन नाही. त्यामुळे शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावे, महिला, तरूण, युवक, युवतींना रोजगारामुळे आर्थिक बळ प्राप्त होईल. बचत गटांना उत्पादनासाठी मार्केटींगची जोडही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून क्रांतीलढ्याचे स्थळ उपेक्षित आहे. शासनाने आद्यकर्तव्य समजून राष्ट्रीय स्मारक घोषित करावे. यासाठी संबंध नागरिक, तरूण मंडळी शासनावर विश्वास ठेवून असल्याचे मत डॉ.अरविंद मालपे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शितल वेरूळकर, धर्मेंद्र ताटीसार यांनी केले तर आभार भरत वणझारा यांनी मानले.सर्जिकल स्ट्राईकच्या कथनाने तरळले अश्रूसत्काराला उत्तर देतांना ले.जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी उरी सर्जिकल स्ट्राईकचा अनुभव कथन केला. यातील एक-एक प्रसंगाचे वर्णन करताना वातावरण सुन्न झाले होते. त्यांच्या या अनुभव क थनाने पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी भावूक झाले होते तर काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.मोदी सरकारच्या निर्णयक्षमतेमुळेच स्ट्राईक शक्य-बावनकुळेमोदी सरकारच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे १९४७ नंतर प्रथमच एवढे मोठे सर्जिकल स्ट्राईक करणे शक्य झाले आहे. या सैनिकांनीच संपूर्ण देशाला सुरक्षित ठेवले आहे. उणे ३५ डिग्रीच्या तापमनात ४० दिवसाचे अन्न सोबत घेवून आपली सेवा देतात, त्या सैनिकांच्या पाठीशी देश उभा राहिला पाहिजे. १२० कोटीच्या देशाला सैनिकांनीच संकटातून वेळोवेळी वाचविले आहे. सैनिकांना निर्णय घेण्याचे व सुसज्ज सुविधा देण्याचे काम सरकारने केल्याने देशाला स्थैर्यता मिळाली आहे, असे प्रतिपादन ना. बावनकुळे यांनी केले.
दहा हजार नागरिकांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:38 PM
स्वातंत्र्यांच्या यज्ञकुंडात प्राणाची आहुंती देणाऱ्या शहीदवीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहा हजार नागरिकांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करुन भावनांना वाट मोकळी करुन दिली.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांची उपस्थिती : ले. जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार, उरी सर्जिकल स्ट्राईकचा प्रत्यक्ष थरार सांगितला