शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

भाडेकरूंची नोंद पोलीस ठाण्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 9:20 PM

घरमालकाने भाडे तत्त्वावर राहायला आलेल्या व्यक्ती, कुटुंबाची पोलीस ठाण्यात नोंद करावी, असा कायदा आहे. मात्र, याविषयी पोलीस विभागाकडून प्रभावी जनजागृतीच होत नसल्याने कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव : पोलीस विभागही गंभीर नाही, कायदा अस्तित्वात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घरमालकाने भाडे तत्त्वावर राहायला आलेल्या व्यक्ती, कुटुंबाची पोलीस ठाण्यात नोंद करावी, असा कायदा आहे. मात्र, याविषयी पोलीस विभागाकडून प्रभावी जनजागृतीच होत नसल्याने कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे चित्र आहे.बापूंचे सेवाग्रामातील वास्तव्य, स्वातंत्र्य संग्रामाची त्यांनी आश्रमातून हलविलेली सूत्रे, पवनार येथील आचार्य विनोबा भावेंचा आश्रम, पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडार यामुळे वर्धा जिल्ह्याचा संपूर्ण जगभरात नावलौकिक आहे. याशिवाय देशातील सर्वांत लहान सहाव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळेच वर्षाकाठी येथे लाखो देशी-विदेशी पर्यटक सातत्याने येत असतात. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालये, केंद्राच्या अखत्यारितील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय  हिंदी विश्वविद्यालय आदी असल्याने शिक्षणाचेही वर्धा हब आहे. यामुळे विदर्भासह महाराष्ट्रातीलच नव्हे, तर इतर राज्य आणि देशातील कुटुंबे वर्ध्यात स्थायी-अस्थायी स्वरूपात वास्तव्याला आहेत. वर्ध्यात कुणाकडे अस्थायी स्वरूपात राहायला व्यक्ती, कुटुंबाने संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करणे गरजेचे आहे. कुणाविषयी संशय असल्यास पोलिसांकडून त्याची खातरजमा केली जाते. मात्र, या नियमाविषयी पोलीस विभाग अर्थात गृह विभागाकडूनही आजवर प्रभावी जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे वर्ध्यासारख्या जगात ख्याती असलेल्या जिल्ह्यात कुणीही येतो अन् कुणीही येतो, असाच अजब प्रकार सुरू आहे. यामुळे गांधी जिल्ह्याच्या सुरक्षेविषयीच प्रश्न निर्माण झाला आहे. वर्ध्यातील साईनगर, स्वागत कॉलनी, स्रेहलनगर, धन्वंतरीनगर, गजानननगर, गोंड प्लॉट, आलोडी, नालवाडी व अन्य भागांत मोठ्या प्रमाणावर भाडेकरू आहेत. मागील महिन्यातच इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्याच्या कुटुंबातील महिलेला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चमूने ताब्यात घेतले. ही महिलादेखील म्हसाळ्यातील एका निवासस्थानी भाडेकरू म्हणून वास्तव्याला होती. वर्ध्यासारख्या महत्त्वाच्या शहरात घातपात घडविण्याचे या संघटनेचे मनसुबे होते की काय, हे मात्र स्पष्ट झाले नाही. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.घरमालकाने भाडेकरूची नोंद करावी हा नियम केवळ बड्या शहरांनाच नव्हे, तर छोट्या शहरांनाही लागू आहे. घरमालकांनी भाडेकरूची नोंद करायलाच हवी. नोंदणी नंतर काही विभागाला काही आढळून आल्यास व्हेरिफिकेशन केले जाते. शहरातील घरमालकांनी भाडेकरूची नोंद करून पोलीस विभागाला सहकार्य करावे.- डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, वर्धा.

टॅग्स :Policeपोलिस