लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी येथील नगर पालिकेत जुन्या पाईप लाईन विक्री प्रकरणात लाखोंचा गैरप्रकार झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मंगळवारी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. येत्या आठ दिवसात मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास देवळी नगर पालिकेसमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.देवळी ते अंदोरीपर्यंतची जुनी जलवाहिनी ही देवळी नगर पालिकेच्या मालकीची आहे. सध्या ती जलवाहिनी निरउपयोगी असून अंदोरी ते वाटखेडा ही सुमारे ८.६ किमीची पाईप लाईन लोखंडी आहे. ती विकण्यासाठी न.प. देवळीत ठराव घेऊन त्याला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, जीर्ण पाईप लाईन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करताना देवळी पालिका प्रशासनाने न.प.तील काही लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवत तसेच नियमांना डावलून ही प्रक्रिया केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालिकेने दरपत्रक मागीतले. पण, सदर दोन्ही यंत्रणेने पाईप लाईन काढणे बाकी असतानाच न. प. मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी पाईप लाईनचा आॅन लाईन लिलाव केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.या लिलावात मनमर्जीच्या कंत्राटदारांनाच सहभागी करण्यात आले. तर इतरांना त्रुट्या दाखवून मनमर्जीने डावलण्यात आले आहे. करण्यात आलेही ही पाईप लाईन विक्रीची कारवाई नियमांना डावलून करण्यात आली आहे. तसेच यात लाखोंंचा गैरप्रकार झाला असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला असून निवेदन देताना नगर सेवक गौतम पोपटकर, श्याम महाजन, राजश्री देशमुख, अश्विनी काकडे, संगीता कामडी, माजी नगरसेवक सुरेश वैद्य, पुरुषोत्तम वानखेडे, रामकुमार बासू यांची उपस्थिती होती. सदर प्रकरणी नगराध्यक्ष सुचिता मडावी यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.पालिका प्रशासनाने पाईप लाईन विक्रीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला एस्टीमेट मागीतले होते. ते आम्हाला प्राप्त झाले आहे. सा.बां. विभागाने ३ लाख ९८ लाखांचे तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सुमारे १६ लाखांचे इस्टीमेट आम्हाला दिले. ज्याने जास्त दर दिला त्यालाच पाईप लाईनची लिलाव पद्धतीने विक्री करण्यात आली आहे.- प्रशांत उरकुडे, मुख्याधिकारी न.प. देवळी.
जुन्या जलवाहिनी विक्रीत लाखोंचा गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 1:00 AM
देवळी येथील नगर पालिकेत जुन्या पाईप लाईन विक्री प्रकरणात लाखोंचा गैरप्रकार झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,...
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : देवळी नगर पालिकेतील प्रकार