शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दुरावलेल्या २५ दिवसांच्या 'बिबट्या'ला पुनश्च मिळाले 'मातृछत्र'

By महेश सायखेडे | Updated: March 10, 2023 17:43 IST

दोघांच्या डोळ्यात होती आभाळाएवढी व्याकूळता

वर्धा : आई खरंच काय असते? लेकराची माय असते. वासराची गाय असते. दुधाची साय असते. लंगड्याचा पाय असते. धरणीची ठाय असते. आई भेटते तो अनुभव म्हणजे एक स्वर्गाची अनुभूती असते, असाच काहीसा प्रसंग आईपासून दुरावलेल्या अवघ्या २५ दिवसांच्या बिबट्याच्या आईसोबत पुनर्मिलन करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह वन्यजीव प्रेमींना गुरुवारी मध्यरात्री आला. इतकेच नव्हे तर त्या दोघांच्याही डोळ्यात आभाळाएवढी व्याकूळताही बघावयास मिळाली.

आर्वी तालुक्यातील दहेगाव नजीकच्या पांझरा शिवारातील प्रल्हाद बडोदे यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू असताना गुरुवारी दुपारी बिबट्याचे पिल्लू आढळून आले. बिबट्याचे पिल्लू बघून परिसरात एकच तारांबळ उडाली. शिवाय या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी झाली. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच आर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव, वनविभागाचे निगोट, मेश्राम, सावंत, चव्हाण, तंबाखे, जी. बी. शेख, भालेराव यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याच्या पिल्लाला सुरक्षित रेस्क्यू केले. त्यानंतर बिबट्याच्या पिल्लाची आरोग्य तपासणी करीत बिबट्याच्या पिल्लाचे आईसोबत पुनर्मिलन करण्याचा निश्चय वनविभागाने केला.

या कार्यात पीपल फॉर ॲनिमल्सच्या स्वयंसेवकांचीही मदत घेण्यात आली. आईसोबत पुनर्मिलन करून देण्याच्या उद्देशाने वनविभागाचे अधिकारी व वन्यजीव प्रेमी २५ दिवसांच्या बिबट्याच्या पिल्लाला सोबत घेऊन रात्रीच्या काळोखात स्वत:च्या जीवावर उदार होत नियोजित ठिकाणी पोहोचले. त्यानंतर बिबट्याच्या पिल्लास एकांतात सोडून त्याच्या हालचालींवर ट्रॅप कॅमेराच्या सहाय्याने वॉच ठेवण्यात आला. मध्यरात्री सुमारे १२.४५ वाजताच्या सुमारास डोळ्यात आभाळा एवढी व्याकूळता असलेली बिबट्याची आई पिल्लाचा आवाज ऐकून पिल्लाजवळ पोहोचली. शिवाय तिने तिच्या पिल्लाला तोंडात धरून जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले.शास्त्रोक्त पद्धतीचा झाला वापर

बिबट्याच्या बछड्याची आरोग्य तपासणी करून तो सुदृढ आहे काय याबाबतची खातरजमा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. त्यानंतर त्याचे आई सोबत पुनर्मिलन होण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. या कार्यात उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहायक वनसंरक्षक बोबडे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. शिवाय पीपल फॉर ॲनिमल्सचे कौस्तुभ गावंडे, ऋषिकेश गोडसे यांची प्रत्यक्ष कृती उपयुक्त ठरली.

टॅग्स :leopardबिबट्याwardha-acवर्धाSocialसामाजिक