वर्धा : आर्वी तालुक्यातील बेढोना येथे शॉर्टसर्किटने आग लागून दोन गोठे शेती साहित्य व घर भस्मसात झाल्याची घटना घडली. बेढोना येथील शेतकरी प्रकाश साठे, प्रशांत सरोदे यांचा गोठा जळून शेती साहित्याचे मोठे नुकसान झाले.
तर गजानन देहारे यांचे घर जळून भस्मसात झाले दोन्ही गोठ्याचे ८० हजाराचे तर घराचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी असा अंदाज आहे.