वर्धा: बापूंनी आपल्या जीवनाच्या माध्यमातून जनतेची सेवा, सद्भाव, करूणा, वात्सल्याचा संदेश दिला.नव्या पिढीने येथे भेट देऊन बापूंच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे असे आवाहन आपल्या अभिप्राय मधून माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी यांनी सेवाग्राम आश्रमातील नोंदवहीतील अभिप्राय मधून केला आहे.
शनिवारी अरूण गुजराथी यांनी प्रसिध्द महात्मा गांधीजींच्या आश्रमाला भेट दिली. त्यांचे आश्रमच्या वतीने सूतमाळेने स्वागत करण्यात आले. त्यांनी बापूंची अहिंसा ही सर्व प्रश्र्नांची सोडवणूकीच्या संदर्भातील उत्तर आहे. आहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, असंग्रह ही बापूंची नीती जोपासणे आवश्यक असल्याचे अभिप्राय मध्ये लिहिले.
त्यांनी आदी निवास,बा व बापू कुटी,बापू दप्तर,आखरी निवास,प्रार्थना भूमीत तसेच परिसरातील झाडांची सुध्दा पाहणी केली आणि इतिहास जाणून घेतला.त्यांच्या सोबत हिंगणघाट चे माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा,प्रभा गुजराथी, संध्या डागा आणि अनील फरसोले होते.