शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
2
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
3
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
4
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
5
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
6
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह १५ सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
7
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
8
... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात
9
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
10
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर
11
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
12
उद्धव ठाकरे की शरद पवार? महायुतीची द्वारे कोणाला खुली होणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
13
बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज
14
Diwali 2024: इकडे कन्फ्युजनमध्ये राहाल, तिकडे शेअर बाजार चालूच राहिल.., पैसा जाईल; ३१ ऑक्टोबरचं काय?
15
राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
16
सोलापुरात सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
17
माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
18
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
19
मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच
20
Salman Khan : सलमान खानला ६ वर्षांत १२ पेक्षा जास्त वेळा जीवे मारण्याच्या धमक्या; कोणी केलेला फोन?

नात्याला काळीमा; नातीनच ठरली आजोबाच्या वासनेची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 2:22 PM

शहारातील धक्कादायक घटनेने खळबळ : शहर पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा : आजी-आजोबाकडे राहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन नातीचे तिच्या ७० वर्षीय आजोबानेच अनेकदा लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना शहरात समोर आली आहे. अत्याचार करणारा आजोबा फरार असून आरोपीचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, १६ वर्षीय पीडितेच्या वडिलांची नोकरी रायपूर जिल्ह्यातील सड्डू येथे असल्याने ती कुटुंबासह तेथेच राहते. पण, तिच्या आई व वडिलांचे घर वर्ध्याला असल्याने पीडिता आई व वडिलांसह वर्ध्याला येत जात राहते. ७ डिसेंबर २०२२ मध्ये पीडितेच्या आईच्या आजीचे निधन झाल्याने सर्व कुटुंबीय वर्धा येथे आले होते. दरम्यान, पीडिता ही वरील खोलीत आराम करीत असताना ७० वर्षीय नराधम आजोबाने खोलीत प्रवेश करून पीडितेचे लैंगिक शोषण केले.

पीडितेने बदनामी आणि भीतीपोटी ही बाब आई-वडिलांना सांगितली नव्हती. मात्र, पीडितेवर मानसिक उपचार सुरू असताना तिने मागील काही वर्षांपासून तिच्यासोबत सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार मानसिकरोग तज्ज्ञांसमोर कथित केला अन् हे बिंग फुटले. पीडितेने आई-वडिलांना सर्व घटना सांगितल्याने वडिलांनी थेट शहर पोलिस ठाणे गाठले. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कथित केल्यावर पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली. शहर पोलिसांनी याप्रकरणी ७० वर्षीय नराधम आजोबाविरुद्ध अत्याचारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पुढील तपास पोस्को सेलच्या पोलिस उपनिरीक्षक वंदना फुकट करीत असून आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना करण्यात आल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

सहा वर्षांपासून सुरू होते शोषण

पीडिता मे २०१६ मध्ये दिवाळीच्या सुट्यांमध्ये आजोबाकडे राहण्यास गेली होती. आजोबाच्या खोलीत तिच्या बहिणीसोबत खेळत असताना विकृत आजोबाने पीडितेशी अश्लील चाळे केले. मात्र, पीडितेने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली नाही. त्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये देखील पीडिता आजोबाकडे गेली असता तिचा लैंगिक छळ झाला. जानेवारी २०२१ मध्ये पीडितेच्या वडिलांच्या वडिलांचे निधन झाल्याने घरच्यांनी तिला आईच्या वडिलांकडे सोडून दिले. तेव्हा देखील पीडितेचा छळ झाला.

७ डिसेंबर २०२२ मध्ये पीडिता दहव्या वर्गात शिकत असताना तिच्या आईच्या आईचे निधन झाल्याने सर्व कुटुंबीय आईच्या वडिलांकडे गेले होते. पीडिता वरील खोलीत असताना पुन्हा नराधम आजोबाने तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा लैंगिक छळ केला. मागील सहा वर्षांपासून पीडिता आजोबाच्या वासनेची शिकार ठरली असून ती डिप्रेशनमध्ये गेली होती. कुणालाही ही बाब तिला सांगता देखील येत नव्हती. अखेर बिंग फुटले अन् हा धक्कादायक प्रकार उजेडात आला.

पीडिता रडत राहिली अन् क्रूरकर्मा चावे घेत राहिला...

पीडिता २०२२ मध्ये तिच्या आईच्या वडिलांकडे गेली असताना नराधम आजोबाने तिच्याशी अश्लील चाळे केले. पीडितेवर बळजबरी करून तिला मारण्याची धमकी देत तिचा लैंगिक छळ केला. पीडितेने विरोध केला. नकार दिला तरी देखील नराधम आजोबा थांबला नाही. पीडिता ओरडत, रडत राहिली, पण क्रूरकर्मा आजोबा तिच्या शरीराच्या विविध भागांवर चावे घेत राहिला.

पीडितेने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

डिप्रेशनमध्ये गेलेली पीडिता ही खचून गेली होती. तिच्यापुढे कुठलाही मार्ग नव्हता. घरच्यांना ही बाब ती सांगू शकत नव्हती. अखेर पीडितेने स्वत:ला संपविण्याचा विचार केला. पीडितेचे फेब्रुवारी २०२३ मध्ये दहावीची सराव परीक्षा सुरू असताना तणावातून स्वत:च्याच हातापायावर ब्लेडने चिरे मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अखेर हे विदारक चित्र तिच्या आई-वडिलांना दिसले. आई-वडिलांनी पीडितेला विचारणा केली पण, पीडितेने घडत असलेला प्रकार सांगितला नाही. अखेर घरच्यांनी पीडितेला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले आणि त्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

मानसोपचार तज्ज्ञाने केलेल्या काउन्सिलिंगमुळे धक्कादायक प्रकाराला फुटली वाचा

पीडितेची मासनिक स्थिती बरोबर नसल्याचे पाहून तिच्या घरच्यांनी तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले. पीडितेची काउन्सिलिंग सुरू असताना पीडितेने तिच्यासोबत होत असलेला प्रकार मानसोपचार तज्ज्ञांजवळ कथित केला. अखेर हे बिंग फुटले अन् घरच्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी कलम ३७६(ठ),३७६(३)(२)(छ),३५४(अ)(१),(२),(३) सहकलम ४,६,८,१२ पोस्को अधिनयिम अतंर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. आरोपी आजोबा फरार असून लवकरच त्यास अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धाSexual abuseलैंगिक शोषण