वर्धाः हिंगणघाट येथील मुख्य बाजारपेठेत एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात शटरचे कुलूप तोडून चोरीचा धाडसी प्रयत्न झाला. मात्र चोरट्यांना फक्त ३० रुपयांवर समाधान मानावे लागले.
हिंगणघाट येथील मोहता चौकातील मुख्य बाजारपेठेत पंजाब नॅशनल बँकेसमोर चंद्रवदन बेलेकर यांचे श्री स्वामी समर्थ इलेक्र्टाॅनिक्स नावाचे इलेक्टाॅनिक्स वस्तू विक्रीचे दुकान आहे. दि. २१ जूनच्या रात्री या दुकानाच्या समोरच्या शटरचे कुलूप तोडुन व शटर एका बाजूने काही प्रमाणात वर करुन चोरट्यांनी कसाबसा दुकानाच्या आत प्रवेश केला. तेथील काउंटरवरील सामानाची फेकाफेक करुन ड्रॉवरमधील सामान अस्त्याव्यस्त फेकले तसेच दुकानातील इतर कोणत्याही बहुमूल्य वस्तूला हात न लावता ड्रॉवर मधील ३० रुपये घेऊन पोबारा केला.
चोरट्यांन शटरचे दुसर्या बाजूचे कुलूप न तोडता आल्याने त्यांना सामान काढण्यासाठी पुरेशी जागा मिळाली नाही म्हणून दुकानातील बहुमुल्य माल बचावला.