शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बदमाश मुलांसोबत का राहतोस? आई रागावल्याने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 4:28 PM

हर्षलला त्याची आई पूजा जुमडे यांनी तू वॉर्डातील बदमाश मुलांसोबत का राहतो, असे म्हणून चांगलेच रागावले. हर्षलला आईने रागाविलेले सहन झाले नाही व त्याने टोकाचे पाऊल उचलले.

ठळक मुद्देडेहनकर लेआऊट येथील घटना : रामनगर ठाण्यात नोंद

वर्धा : आपल्या मुलाची चांगल्या मित्रांशी संगत असावी, असे प्रत्येक पालकांना वाटते; मात्र पाल्य जेव्हा आपल्याच आई-वडिलांना चुकीचे ठरवितात तेव्हा त्या आई वडिलांच्या काळजाचा ठोकाच चुकतो, असाच प्रकार सिंदी मेघे परिसरातील डेहनकर लेआऊट परिसरात घडला.

एका २३ वर्षीय मुलाने आईच्या रागावर राहत्या घरी चक्क नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या करून जीवन संपविले; अन् आई-वडिलांच्या पाया खालची वाळूच सरकली. हर्षल पंढरीनाथ जुमडे (२३) असे मृतक युवकाचे नाव आहे.

हर्षल हा परिसरातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांसोबत राहत होता. सर्वाधिक वेळ तो त्यांच्यासोबतच घालवत होता. त्यामुळे हर्षलची आई अनेकदा त्याला अशा मुलांसोबत मैत्री नको करू, बोलत नको जाऊ असे सांगत होती. १४ रोजी हर्षलला त्याची आई पूजा जुमडे यांनी तू वॉर्डातील बदमाश मुलांसोबत का राहतो, असे म्हणून चांगलेच रागावले; पण हर्षलला आईने रागाविलेले सहन झाले नाही आणि त्याने राहत्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

त्याच्या आत्महत्येची माहिती घरच्यांना मिळताच आई-वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. याप्रकरणी पूजा जुमडे यांनी रामनगर पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून हर्षलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूwardha-acवर्धा