शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

तरुणाच्या डोक्यावर केले तलवारीने वार, आरोपींना ठोकल्या बेड्या

By चैतन्य जोशी | Published: April 08, 2023 4:24 PM

गोंडप्लॉट परिसरातील घटना

वर्धा : मला कामावर का नेत नाही, असे म्हणत वाद करुन तरुणाच्या डोक्यावर आणि मानेवर तलवारीने सपासप वार करुन त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गोंडप्लॉट परिसरात घडली. याप्रकरणी ७ रोजी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केल्याची माहिती दिली. आनंद वसंत ठाकरे (३०) रा. सुदर्शन नगर पिपरी मेघे असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर मंगेश टेकाम रा. गोंडप्लॉट आणि गणपत उईके रा. पंजाब कॉलनी असे अटक आरोपींची नावे आहेत.

आनंद वसंत ठाकरे हा उत्तम गलवा कंपनीत राखड भरलेले ट्रक रिकामे करण्याचे काम करतो. तो ६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सायकलने गोंड प्लॉट परिसरात त्याच्यासोबत काम करणाऱ्या कामगाराकडे पैसे देण्यासाठी गेला होता. पैसे देऊन परत घराकडे जात असताना आरोपी मंगेश टेकाम याने आवाज देत तु मला कामावर का नेत नाही, असे म्हटले.

दरम्यान आरोपी गणपत उईके हा देखील तेथे होता. गणपतने घरातून तलवार आणत मंगेशच्या हाती दिली. मंगेशने तलवारीने आनंदच्या डोक्यावर व मानेवर वार केले. आनंदने जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत ते वार हाताने झेलले. त्यामुळे त्याच्या हाताला देखील गंभीर जखमा झाल्या. डोक्यावर व मानेवर तलवारीने वार करीत दोघांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी आनंदला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिसांना दिलेल्या बयाणात त्याने ही सर्व आपबिती सांगितली. पोलिसांनी बयाण नोंदवून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा