लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सर्व स्कूल बस चालक व मालकांसाठी ८ ते ३१ मे या कालावधीत विशेष स्कूल बस तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत स्कूल बसची तपासणी न करणाऱ्यांच्या वाहनांचा परवानाच निलंबित करण्यात येणार आहे. परिणामी, स्कूल बसची तपासणी न करून घेणाऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे.शाळकरी मुला-मुलींची वाहतूक करणाºया स्कूल बस मालक, शाळा संचालक यांनी त्यांच्याकडे असलेल्या स्कूल बसची वेळोवेळी तपासणी करून घेणे क्रमप्राप्त आहे. विशेष म्हणजे २४ मार्च २०१७ उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र. २/२०१२ च्या सुनावणीच्या वेळीस उच्च न्यायालयाने उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शाळकरी मुलांची वाहतूक करणाºया बससेची सुरक्षतेच्या दृष्टीने फेर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय परिवहन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली १० मे २०१८ ला झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार व शासन अधिसूचना क्र. एम.व्ही.आर./सी.आर. ६३७/२०१३/का. २ (३)/जा.क्र. ५६०९ दि. ६ एप्रिल २०१७ नुसार स्कूल बस संदर्भात नियमावली लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे शाळकरी मुला-मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करणे क्रमप्राप्तच आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कूल बस वाहनाची फेरतपासणी करण्यासाठी मौजा सालोड हिरापूर येथील वाहन तळावर ८ मे २०१९ ते ३१ मे २०१९ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ही विशेष मोहीम सुविधेसाठी असली तरी त्याच्याकडे पाठ करणाऱ्यांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कठोर कारवाईच करण्यात येणार आहे. त्यामुळे स्कूल बस चालक, मालक व शाळा संस्थांनी वाहनांची तपासणी करणे गरजेचे आहे.फेरतपासणी सर्व स्कूलबससाठी क्रमप्राप्तमोटार वाहन कायदा कलम ५६ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या योग्यता प्रमाणपत्र वैध असले तरी स्कूल बस फेरतपासणी करून घेणे आवश्यक आहे.सदर फेरतपासणीमध्ये दोष आढळून आल्यास दोष पूर्ण करून सदर स्कूल बस हे सर्व सुरक्षातत्त्वाचे पालन करीत आहे, अशा आशयाचे प्रमाणपत्र संबंधितांना देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे ही फेरतपासणी सर्व स्कूल बस वाहनांना अनिवार्य आहे.जिल्ह्यात एकूण ४७४ स्कूल बसवर्धा जिल्ह्यात शाळकरी मुला-मुलींची वाहतूक करणाºया छोट्या व मोठ्या अशा एकूण ४७४ स्कूल बसेस असल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आहे. या सर्व स्कूल बसेसची सदर विशेष मोहिमेदरम्यान फेरतपासणी होणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांची सुरक्षा तसेच विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास या हेतूने ८ ते ३१ मे या कालावधीत स्कूल बसची फेरतपासणी करण्यात येणार आहे. ज्या स्कूलबसची सदर कालावधीत फेरतपासणी केली जाणार नाही त्या वाहनाचा परवाना निलंबीत करण्यात येणार आहे.- विजय तिरणकर, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.
...तर स्कूल बसचा परवाना होईल निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 9:41 PM
प्रत्येक विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सर्व स्कूल बस चालक व मालकांसाठी ८ ते ३१ मे या कालावधीत विशेष स्कूल बस तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
ठळक मुद्देउपप्रादेशिक परिवहनचा बडगा : ८ ते ३१ मे विशेष मोहीम