ग्रामपंचायतीकडे थकले होते जीवन प्राधिकरणचे देयक सेवाग्राम : येथील आदर्शनगर परिसरात दर उन्हाळ्याला पाणी टंचाई डोके वर काढते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. असे असताना यावर अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यात आली नाही. यामुळे येथील नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. सध्या येथील नागरिकांना चार ते पाच दिवसानंतर पाणी मिळत आहे. आदर्शनगर प्रभाग तीन वसाहती आहेत. शिवाय ग्रामपंचायतीची स्वतंत्र्य पाणी पुरवठा विहीर आहे. येथे चारशेच्या जवळपास घरे असून या भागाचा ले-आऊटमुळे विस्तार होत आहे. दोन हातपंप असतानाही दरवर्षी उन्हाळ्यात पाणी समस्यसा तीव्ररूप धारण करते. ग्रा.पं.ची तारांबळ उडून धावाधाव सुरू होते. असा दरवर्षीचा शिरस्ता पडला. यामुळे पाणी टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजन आखण्याची मागणी आहे. नागरिकांना पाणी पुरविण्याकरिता ग्रा.पं.च्या मागणीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पुरवठा केला. मे, जून, जुलै २०१६ या तीन महिन्यांचे देयक ७५ हजार झाले. ते भरण्याची जबाबदारी ग्रा.पं. प्रशासनाची असूनही त्यांनी देयक अदा केले नाही. अखेर वेळेवर सरपंच रोशना जामलेकर व सचिव अजय येवले यांनी कार्यकारी अभियंता डी.एस. वाघ यांची भेट घेतली. पैसे भरण्याचे आश्वासन दिले. ग्रा.पं. प्रशासनाचा जीवन प्राधिकरणाला वाईट अनुभव देयकाबाबत असल्याने पहिले थकित बिल भरा नंतरच पाणी, अशी भूमिका घेतल्याने ग्रामविकास अधिकारी येवले यांनी ४० हजारांचा धनादेश देवून मार्ग काढला.(वार्ताहर)आदर्श नगरसाठी स्वतंत्र पाणी पुरवठ्यासाठी विहीर व जलकुंभ आहे. उन्हाळ्यात विहिरीचे पाणी आटत असल्याने रोजच पाण्याचा प्रश्न उद्भवतो. चार वर्षांपूर्वी ग्रा.पं. प्रशासनाने जुन्या वस्तीतील विहिरीवरून पाईपलाईन आदर्शनगरच्या विहिरीत टाकली. पण मूळ गावतच पाणी कमी असल्याने पाईला लाईनचा खर्च व्यर्थ ठरला. ऐवढेच नाही तर २०१६ मध्ये विहिरीत बोर केले; पण पुरेसे पाणी लागले नसल्याने जीवन प्राधिकरणाशिवाय पर्याय नाही.सरपंच, सचिवाशी चर्चा झाली. धनादेश जमा करण्यात आला आहे. जुलै २०१६ नंतर पासून कनेक्शन बंद असल्याने लवकरच तपासणी करून आदर्श नगर वासियांना पाणी मिळेल. ग्रा.पं.ने आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवल्यास पाणी द्यायला हरकत नाही.- अभियंता चवडे, अभियंता, जीवन प्राधिकरण
आदर्शनगरात पाण्यासाठी संताप
By admin | Published: April 12, 2017 12:17 AM