सुधीर खडसे वर्धा- भारतात अनेक भागात कापूस वेचणीचे काम महिला मजूरांकडून करून घेतले जाते. मात्र महिला मजूरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतीय कृषी कापूस अनुसंधान संस्थेने आॅक्टोबर २००४ मध्ये या संदर्भात अभ्यास करून शासनाकडे निष्कर्ष अहवाल सादर केला होता. यावर कार्यवाही करून कापूस वेचणीच्या कामात यांत्रिकीकरण, महिलांचा त्रास कमी होणाऱ्या बाबी अमलात आणाव्या अशा सूचना केल्या होत्या. मात्र या अहवालावर कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे कापूस मजूरांच्या व्यथा कायमच आहे. जगात भारत, पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया, इस्राईल, अमेरिका या देशामध्ये ९० टक्के कापसाचे उत्पादन होते. येथे कापूस वेचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. भारतात मात्र महिला मजूरांकडून कापूस वेचून घेतला जातो. पाच बोटांमध्ये कापूस पकडून तो बोंडाबाहेर काढण्याचे काम करण्यात येते. कापूस वेचणीची ही पद्धती अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामध्ये मणक्याचे आजार, कंबरेचे आजार आदीही होतात असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.आॅक्टोबर २०१४ मध्ये भारतीय कृषी अनुसंधारण परिषदेने कापूस पिकावर जागतिक संशोधन केले. या संशोधनात कापूस वेचणीबाबत काही निष्कर्ष मांडले. त्यात भारत आणि पाकिस्तान आणि चीन या देशात कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करण्याची टक्केवारी शून्य असल्याचे नमूद केले आहे. कापूस वेचणीसाठी मराठवाड्यातील परभणी येथील कृषी विद्यापीठाने कापडाचा खिसा असलेला कोट वापरण्याची सूचना केला होती. समोरच्या भागात साडेपाच किलो कापूस मावेल असा पद्धतीचा कोट तयार करण्यात आला होता. मात्र कापूस वेचणाºया महिला स्वखर्चाने हा कोट खरेदी करीत नाही. असे आढळून आले. नॅशनल हार्टिकल्चर मिशनचे संचालक चंद्रशेखर पडगिलवार यांनी म्हटले आहे की, भारतात कापूस वेचणीचे यंत्र तयार करण्यात आले आहे. हे यंत्र बोंडाजवळ नेल्यावर ५० ते ६० किलो कापूस एका तासात वेचते. एका तासात १०० किलो कापूस वेचणे शक्य आहे परंतु आपल्याकडे राज्य सरकारचा कृषी विभाग कापूस वेचणीच्या कामात यांंत्रिकीकरणाचा वापर करून घेण्याबाबत प्रचंड उदासीन आहे. त्यामुळे आजही महिलांना कापूस वेचणीचे काम करावे लागत आहे. यंदा कापूस वेचणी महागलीपूर्वी विदर्भाच्या विविध भागात एक महिला दिवसभर जितका कापूस वेचत होती. त्यानुसार किलोच्या आधारे रोजी दिली जात होती. यंदा मात्र २०० रुपये रोजीच्या महिला कापूस वेचणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना ठेवाव्या लागत आहे. एक महिला साधारणत: २० ते २५ किलो कापूस दिवसभरात वेचते. पूर्वी १३० रूपयात हे काम व्हायचे आता २०० रुपये द्यावे लागत आहे. म्हणजे ७० रुपए अधिकचे शेतकऱ्याला मोजावे लागत आहे. त्यामुळे आता कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणावर भर देणे गरजेचे झाले आहे. विदर्भात कापूस हे सर्वात महत्वाचे पीक आहे. व ते नगदी असल्याने शेतकरी यावरच उभा आहे.
राज्यात कापूस वेचणीच्या संशोधन अहवालावर कार्यवाही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:36 PM
भारतीय कृषी कापूस अनुसंधान संस्थेने सादर केलेल्या अहवालावर अद्याप कारवाई न झाल्याने कापूस वेचणी करणा:या महिला मजुरांचे हाल तसेच राहिले आहेत.
ठळक मुद्देवर्ध्यात महिला मजूरांना त्रास यांत्रिकीकरणाकडे सरकारची पाठमणक्याचे आजार, कंबरेचे आजार होतात