लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावेळी ईदगाह आणि मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण होणार नसल्याची माहिती मुस्लिम बांधवांच्या संस्थांद्वारे देण्यात आली आहे. रमजान ईदमुळे मुस्लिम समाजबांधवांत उत्साहाचे वातावरण आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात महामारीची स्थिती आहे. अशा परिस्थितीत रमजान ईदला मशिद अथवा ईदगाहवर सामूहिक नमाज पठण न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ईदकरिता कपड्यांची खरेदी करू नये, यामुळे शासन-प्रशासनाच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची अवहेलना होऊ शकते. शासन-प्रशासनाच्या आदेशाचे मुस्लिम समाजबांधवांनी काटेकारपणे पालन करावे, असे आवाहन तन्जीम-ए-गौसियाचे अध्यक्ष मौलाना ए. के. नुरी, सचिव शोएब अहमद कन्नौजी, गौस मोहम्मद, मोहम्मद शफी, कल्लू टवारी, मौलाना फरफुद्दिन बावा रिजवी, लईक अहमद फारूकी, समीर बेग, शेख बशीर, शेख मतीन, अमान उल्लाह खान, शब्बीर खाँ बावा, हाजी शेख अहमद, हाजी शेख अकील, अर्शी मलिक शेख, सय्यद रशीदभाई, जामा मशिद कमिटीचे अताउल्ला खाँ पठाण, सय्यद आसिफ अली, जैनुल आबेदिन, लईक अहमद फारूकी, सलीमभाई, नगीना मशिद कमिटीचे तौफिक मुसानी, अल्ताफ चिनी आदींनी समाजबांधवांना केले आहे.
रमजान ईदला सामूहिक नमाज पठण नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:00 AM
रमजान ईदमुळे मुस्लिम समाजबांधवांत उत्साहाचे वातावरण आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात महामारीची स्थिती आहे. अशा परिस्थितीत रमजान ईदला मशिद अथवा ईदगाहवर सामूहिक नमाज पठण न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ईदकरिता कपड्यांची खरेदी करू नये, यामुळे शासन-प्रशासनाच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची अवहेलना होऊ शकते. शासन-प्रशासनाच्या आदेशाचे मुस्लिम समाजबांधवांनी काटेकारपणे पालन करावे, ....
ठळक मुद्देपार्श्वभूमी कोरोना महामारीची : शहरातील विविध मुस्लिम संघटनांचा निर्णय