लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अद्ययावत तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात विस्तारत असताना केवळ एका क्षेत्रापुरते ज्ञानाला सिमित ठेवून चालणार नाही. चौफेर असे ज्ञान विद्यार्थ्यांनी संपादीत करणे गरजेचे आहे. अद्यायावत तंत्रज्ञानामध्ये ज्ञानाच्या परिभाषा बदलल्या आहेत. याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. कुठलेही क्षेत्राची निवडही त्यात कौशल्य विकसित करता आले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द आणि प्रयत्नामध्ये सातत्य ठेवले तर अवघड असे काही नाही, असे प्रतिपादन डॉ. आर. एस. कडू यांनी केले.सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्यावतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात अप्लीकेशन आॅफ मेकॅनिकल इंजिनिअरींग (ए.एम.ई १८) या विषयावर सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर प्राचार्य डॉ. जी.व्ही. ठाकरे, डॉ. सुहास कोंगरे, विभाग प्रमुख डॉ. एम. जे. शेख, प्रा. आर. जे. डहाके, प्रा. राजेश ठाकरे, प्रा. योगेश महंतारे, प्रा. जी.पी. ढलवार यांची उपस्थिती होती.डॉ. कडू पुढे म्हणाले, कुठलाही विषय किंवा क्षेत्र निवडा; पण त्यात कौशल्य विकसित करा. स्पेशालिटी निर्माण झाली पाहिजे. त्यांनी स्वत: कंपनीचे अनुभव आणि कार्यपद्धती सांगितली. सिव्हील इंजि. सोडून पोलिटेक्निक मध्ये मेकॅनिकला प्रवेश घेतला. भविष्य उज्वल करण्याचा ध्यास घेतला की स्वताला झोकून द्याव लागतं. हे सर्व चिकाटी आणि प्रयत्नामध्ये सातत्य ठेवल्याने होत त्यामुळे ध्येयप्रती स्वत:ला झोकून द्यावा. पॅशन असल्याशिवाय सक्सेस मिळत नाही असा यशाचा मुलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगसह सर्व क्षेत्रात अद्यायावत तंत्रज्ञानाने उत्तुंंग झेप घेतली आहे. तंत्रज्ञानाचे बदलते स्वरूपाचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्हावा. अद्यावत तंत्रज्ञानाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना सामील होवून तंत्रज्ञान आत्मसात करावे असे ते म्हणाले. प्रा. ठाकरे यांनी कार्यशाळेची रूपरेषा विषद केली. संचालन अंकीत टिपले, श्रृष्टी टेटे यांनी केले तर आभार वैष्णवी कुभंलवार हिने मानले. कार्यशाळेला विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रयत्नात सातत्याशिवाय ध्येय प्राप्ती नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:02 AM
अद्ययावत तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात विस्तारत असताना केवळ एका क्षेत्रापुरते ज्ञानाला सिमित ठेवून चालणार नाही. चौफेर असे ज्ञान विद्यार्थ्यांनी संपादीत करणे गरजेचे आहे. अद्यायावत तंत्रज्ञानामध्ये ज्ञानाच्या परिभाषा बदलल्या आहेत.
ठळक मुद्देआर.एस. कडू : बापुराव देशमुख अभियांत्रिकीतील राष्ट्रीयस्तरीय परिषद