शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

आजनसरा बॅरेजची प्रतीक्षा कायमच

By admin | Published: December 29, 2014 2:01 AM

वर्षानुवर्षे खितपत पडल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाही, ही परंपराच जणू वर्धा जिल्ह्याला लाभली आहे़ निम्न वर्धा, लाल नाला या प्रकल्पांतून याचा प्रत्यय आला़

वर्धा : वर्षानुवर्षे खितपत पडल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाही, ही परंपराच जणू वर्धा जिल्ह्याला लाभली आहे़ निम्न वर्धा, लाल नाला या प्रकल्पांतून याचा प्रत्यय आला़ आता आजनसरा बॅरेज उपसा सिंचन प्रकल्पाचेही भिजत घोंगडे कायम आहे़ २००१ मध्ये भूमिपूजन झालेल्या व प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या प्रकल्पाची किंमत वाढतेय; पण प्रकल्पाची प्रतीक्षा संपताना दिसत नाही़वर्धा नदीवर आजनसरा गावानजीक आजनसरा बॅरेज उपसा सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पांतर्गत नदीच्या पात्रात दगडी बांधकामात बॅरेज प्रस्तावित आहे़ नदीच्या दोन्ही बाजूला मातीचा बंधारा, बॅरेजच्या वरील बाजूस जॅकवेल, रायझिंग मेन, वितरण हौद व दोन मुख्य कालवे प्रस्तावित आहेत. आजनसरा प्रकल्पास १९९६-९७ च्या दरसुचीनुसार १५८ कोटी २१ लाख रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान आहे. मूळ प्रशासकीय मान्यतेनंतर पाच वर्षे निधी प्राप्त झाला नाही़ यामुळे किंमत वाढली़ नव्याने प्रशासकीय मान्यता घ्यावी लागली. या प्रकल्पास राज्य शासनाने २७ नोव्हेंबर २००६ रोजी २००५-०६ च्या दरसुचीनुसार २०८ कोटी ४२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान केली़ या प्रकल्पाचे भूमिपूजन ६ एप्रिल २००१ रोजी पार पडले़ सध्या या प्रकल्पाचा सर्वसाधारण आराखडा प्रदेश कार्यालयाकडून ७ फेबु्रवारी २००८ रोजी मंजूर करण्यात आला़ पंपगृहाचा आराखडा मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिककडून तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ३१.५६ हेक्टर वनजमीन बाधित होते. त्याच्या निर्वनीकरणच्या प्रस्तावास २५ एप्रिल ०६ रोजी केंद्र शासनाकडून तत्वत: मान्यता प्राप्त झाली़ त्यानुसार वन विभागाकडून २८ जानेवारी २०१३ रोजी एनपीव्ही व पर्यायी वनीकरणाकरिता ५८३.६० लाख इतक्या रकमेची सुधारित मागणी प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने २३०.३९ लाख इतक्या रकमेचा भरणा वनखात्यास एप्रिल २०११ मध्ये करण्यात आलेला आहे. उर्वरित ३५२.२१ लाख इतक्या रकमेचा भरणा अद्यापही करावयाचा आहे़ याशिवाय केंद्रीय जल आयोग व पर्यावरणाची परवानगी यासह विविध कारणांमुळे अद्यापही आजनसरा बॅरेजचे काम पूढे सरकलेले नाही़ यामुळे शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पाची प्रतीक्षाच करावी लागत आहे़ जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांनी लक्ष घेत प्रकल्पाचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)