शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

‘ते’ चक्क नावेतून करतात दुधाची ने-आण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 10:14 PM

तालुक्यातील निम्न वर्धा धरणात बॅकवॉटरमुळे तयार झालेल्या बेटावर चार युवकांनी १२० म्हशी पाण्यातून पोहत नेल्या, दररोज पहाटे धरणाच्या पाण्यातून जाणे-येणे करण्यासाठी त्यांनी नाव विकत घेतली. त्या स्थळी ते नावेने जातात, दूध काढतात आणि दूध घेऊन परत येतात. परिसरात सकस दुधाचे वाटप करतात.

ठळक मुद्देधरणातील बेटावर १२० म्हशींचे संगोपन

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील निम्न वर्धा धरणात बॅकवॉटरमुळे तयार झालेल्या बेटावर चार युवकांनी १२० म्हशी पाण्यातून पोहत नेल्या, दररोज पहाटे धरणाच्या पाण्यातून जाणे-येणे करण्यासाठी त्यांनी नाव विकत घेतली. त्या स्थळी ते नावेने जातात, दूध काढतात आणि दूध घेऊन परत येतात. परिसरात सकस दुधाचे वाटप करतात.प्रयत्न केल्यावर कोणतीही बाब सहज साध्य होते, हे या चार युवकांनी आपल्या कष्टाने सार्थ करून सर्वांना दाखविले. संदीप आंबुडारे, गुड्डू वाळके, सचिन आंबुडारे, भारत मानकर हे या चौघा युवकांची नावे असून ते आर्वी तालुक्यातील बोरगाव हातला येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. म्हशी आहे; पण चाराच नाही. तालुक्यात वैरणाची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने गुराढोरांचे काय? असा प्रश्न गोपालक व शेतकऱ्यांनी उपस्थित केला. या चौघा युवकांनी एकत्र येत निम्न वर्धा धरणात निर्माण झालेल्या बेटावर १२० म्हशी नेऊन त्यांची नैसर्गिकरीत्या सकस आहाराची सोय केली. आर्वी तालुक्यात निम्न वर्धा धरण आहे. २४ गावे या धरणाने उजाड केली. अडीच हजार हेक्टरमध्ये हे धरण असून पुरेसा पाणीसाठा आहे; मात्र काही ठिकाणी चढ-उतार असल्याने पाणी आटले आणि तेथे हिरवीगार चाºयाची बेटे निर्माण झाली. पंचेवीस-पंचेवीस एकराचे हे दोन बेट असून आजूबाजूला पाणी आहे. नांदुरा काळे गावापासून सात किलोमीटर अंतरावर हे बेट आहे. टंचाईवेळी संदीप आंबुडारे, गुड्डू वाळके, सचिन आंबुडारे, भारत मानकर हे युवक चाºयाच्या शोधात असताना त्यांना हे बेट गवसले. त्यांनी या जागी म्हशी नेण्याचे नियोजन केले. नावेला बांधून काही म्हशी तेथे नेल्या. उर्वरित म्हशी पाण्यात सोडून त्यांच्यामागे पोहत-पोहत त्या म्हशी हाकलत त्या बेटावर नेल्या. सध्या तेथे १२० म्हशी आहेत. मुबलक प्रमाणात म्हशींना नैसर्गिक चारा उपलब्ध झाला. पाण्याचा ही प्रश्न मिटला आहे. निवास, राखणदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :milkदूध