लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : शहरातील गोळीबार चौकात परिसरातील दाबा रोडवरील बाजार ओळीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चांगलाच धुमाकूळ घातला. चौधरी ज्वेलर्स फोडून जवळपास ५ लाखांचा ऐवज लंपास केला तर चंडिका फेब्रीकेटर्स, प्रथमेश ज्वेलर्स व प्रणोती ज्वेलर्स या दुकानातही चोरट्यांनी तोडफोड करुन चोरीचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारच्या मध्यरात्रीदरम्यान घडली असून शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दाबा रोडवर रोशन महादेव चौधरी यांच्या मालकीचे चौधरी ज्वेलर्स आहे. या दुकानाला लागलेले ग्रील गेट तसेच शेटर्सची ५ कुलपाचे अँगल कापून दुकानातील चांदिचे व बेंटेक्सचे दागिने लंपास केले. सोन्याचे सर्व दागिने तिजोरीत ठेवले असल्याने ते बचावले.चोरट्यांनी हातोडीने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला पण, यश आले नाही. यात ५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज रोशन चौधरी यांनी व्यक्त केला. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी या दुकानाबाहेरील आणि आतील सिसीटिव्ही कॅमेरे फोडले. या दुकानातून चोरट्यांनी आपला मोर्चा लगतच्या चंडिका फेब्रीकेटर्सकडे वळविला. या दुकानाच्या कॅमेऱ्यात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहे. पाच चोरटे असून ते चारचाकी वाहनाने आल्याचेही दिसून आले आहे. या दुकानाचेही कुलूप तोडले पण, हाती काहीही लागले नाही. त्यानंतर राम प्रांजळे यांच्या मालकीचे प्रथमेश ज्वेलर्स आणि प्रणोती ज्वेलर्सचेही कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. परंतु येथून त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. या परिसरात रात्री १ वाजतादरम्यान एक अनोळखी अपंग व्यक्ती फिरताना दिसून आल्याचे बोलेले जात आहे. चोरीची माहिती मिळताच रोशन चौधरी यांनी कारंजा पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी जगदिश डफ यांच्या नेतृत्वात चौकशी सुरु करण्यात आली. त्यांनी दुकानातील ठसे घेऊन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. तसेच वर्ध्यातील स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेची टिमही कारंजाला पोहोचली. त्यांनीही माहिती घेऊन तपास सुुरु केला आहे. चोरट्यांनी चोरीपूर्वी कॅमेरे फोडून टाकले पण, काही ठिकाणी त्यांच्या हालचाली कैद झाल्या असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. पुढील तपास कारंजाचे ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक योगेश चाकोरे, सचीन इंगळे करीत आहेत.
कारंजा येथे चोरट्यांचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 11:46 PM
शहरातील गोळीबार चौकात परिसरातील दाबा रोडवरील बाजार ओळीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चांगलाच धुमाकूळ घातला. चौधरी ज्वेलर्स फोडून जवळपास ५ लाखांचा ऐवज लंपास केला तर चंडिका फेब्रीकेटर्स, प्रथमेश ज्वेलर्स व प्रणोती ज्वेलर्स या दुकानातही चोरट्यांनी तोडफोड करुन चोरीचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देचौधरी ज्वेलर्समधून ऐवज लंपास : तीन दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न