लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इंदिरा मार्केटमधील राजवीर ट्रेडर्स व कमल प्रोव्हिजन ही दोन किराणा साहित्याची दुकाने पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी या दुकानांमधून ४० हजारांची रोख व किराणा साहित्य चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. स्थानिक पोलिसांकडून गस्तच घातली जात नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढले असल्याची चर्चा घटनास्थळी होती, हे विशेष.प्राप्त माहितीनुसर, पहाटे ४ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी सुरू होत्या. याच दरम्यान चोरट्यांनी काम फत्ते केल्याची चर्चा परिसरातील व्यावसायिकांमध्ये होती. सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता ओम पंजवानी व कमल आहुजा यांना त्यांच्या मालकीच्या दुकानांचे शटर वाकून असल्याचे आणि दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना दिली. चोरी झाल्याची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चोरट्यांनी दुकानातून ४० हजाराची रोख व किराणा साहित्य चोरून नेल्याची तक्रार पुलगाव पोलिसात दाखल करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस ठाणे अवघ्या ५० फुटांवरज्या दुकानांमध्ये चोरी झाली, ते दुकान पुलगाव पोलीस ठाण्यापासून अवघ्या ५० फुटांच्या अंतरावर आहे. पोलीस ठाण्याच्या शेजारीच चोरी झाल्याने पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत.
चोरट्यांनी बाजारपेठेतील दोन दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 9:41 PM
शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इंदिरा मार्केटमधील राजवीर ट्रेडर्स व कमल प्रोव्हिजन ही दोन किराणा साहित्याची दुकाने पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी या दुकानांमधून ४० हजारांची रोख व किराणा साहित्य चोरून नेले.
ठळक मुद्दे४० हजारांची रोख, किराणा साहित्य लंपास