लोकमत न्यूज नेटवर्कआकोली/ खरांगणा : पाहूनपणासाठी आलेल्या मामाने भाचीच्या घरातून मौल्यवान साहित्यासह रोख लंपास केल्याची घटना महाकाळी येथे घडली. या प्रकरणातील आरोपी अशोक हरिषचंद्र भलावी (४२) रा. नागपूर याला खरांगणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.सविस्तर वृत्त असे की, नजीकच्या महाकाळी येथील हरिदास बापूराव धुर्वे यांच्याकडे आरोपी अशोक भलावी हा पाहुणा म्हणून आला होता. १५ आॅगस्टला आरोपीने घरच्यांची नजर चुकवून घरातील कपाटातून १५ हजार रुपये रोख व ८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तोरड्या तसेच जोडवे चोरून नेले होते. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आपल्या तपासाला गती देत गोपनिय माहितीच्या आधारे अशोक भलावी याला ताब्यात घेवून विचारपूस केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात जमादार प्रेमराज बावणे, संजय पंचभाई, पोलीस नायक राजेश डहाळ, राजेश शेंडे यांनी केली.आरोपी चार दिवसीय पोलीस कोठडीतअटकेची कारवाई पुर्ण केल्यानंतर आरोपी अशोक भलावी याला पोलिासांनी न्यायालयात हजर करून त्याची चार दिवसीय पोलीस कोठडी मिळविली आहे. सदर आरोपीपासून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात असून पोलीस कोठडीदरम्यान आरोपीकडून पोलीस चोरीचे दागिने व रोख जप्त करणार आहेत.
‘मामा’ निघाला भाचीच्या घरातला ‘चोर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:37 PM
पाहूनपणासाठी आलेल्या मामाने भाचीच्या घरातून मौल्यवान साहित्यासह रोख लंपास केल्याची घटना महाकाळी येथे घडली. या प्रकरणातील आरोपी अशोक हरिषचंद्र भलावी (४२) रा. नागपूर याला खरांगणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ठळक मुद्देरोखेसह मोल्यवान साहित्य लंपास