तिसऱ्या दिवशीही चंद्रशेखरचे गायींसोबत उपोषण सुरूचसिंदी (रेल्वे) : येथील चंद्रशेखर बेलखोडे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्याप कुठलाही तोडगा निघाला नाही. शनिवारी पालिकेच्यावतीने कुठलाचा निर्णय घेतला नाही. सदर उपोषण हेतुपूरस्सर असल्याचे म्हणत पालिकेने उपोषण मागे घेण्याबाबत उपोषणकर्त्यास पत्राद्वारे कळविले आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी सायंकाळी विनायक झिलपे यांच्यासह एका शिष्टमंडळाने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक पुष्पा सोनटक्के, कॉँग्रेस गटनेता तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आशीष देवतळे, भाजपाचे नगरसेवक प्रवीण सिर्सीकर, संचालक खरेदी विक्रीचे अमोल सोनटक्के, मोहन सुरकार, अरूण ढेंगरे, प्रभाकर काळबांडे, अशोक सातपूते व इतर अन्य नागरिकांनी मुख्याधिकारी रविंद्र ढाके यांची भेट घेवून चर्चा केली. उपोषणकर्ता चंद्रशेखर याने उपोषण सोडविण्यासाठी त्यांच्या मेलेल्या गाईचा आर्थिक मोबदला व यापुढे गाव स्वच्छतेचे लिखित आश्वासन प्रशासनाद्वारे देण्याची मागणी केली आहे. ही मागणी कायद्याच्या कक्षेत बसत नसल्याने आर्थिक मोबदला देणे शक्य होणार नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी शिष्टमंडळला सांगितले. (प्रतिनिधी)
तिसऱ्या दिवशीही चंद्रशेखरचे गायींसोबत उपोषण सुरूच
By admin | Published: September 25, 2016 2:07 AM