लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : अलमडोह येथील दारूबंदी महिला मंडळाच्या अध्य्यक्षांचे पती दामोधर चिंधू वानखडे (३६) याने गावातील महिलेला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता घडली. या प्रकरणी आरोपीस अटक केली असून तलवार जप्त करण्यात आली.अलमडोह येथीलच संजय साळवे यांच्या घरासमोरील ओट्यावर महिला बसून होती. तिला दामोधर वानखडे याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय हातात तलवार घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दामोधर याला अटक केली. त्याने गावात लपवून ठेवलेली तलवार जप्त करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता आरोपीची १५ दिवसांसाठी कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार विजय नाईक, प्रमोद पिसे, संजय वानखेडे, प्रवीण भोयर, प्रशांत भाईमारे यांनी केली.
दहशत पसरविणाऱ्यास तलवारीसह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:30 PM
अलमडोह येथील दारूबंदी महिला मंडळाच्या अध्य्यक्षांचे पती दामोधर चिंधू वानखडे (३६) याने गावातील महिलेला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता घडली. या प्रकरणी आरोपीस अटक केली असून तलवार जप्त करण्यात आली.
ठळक मुद्दे१५ दिवस कोठडी : आरोपी दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षाचा पती