शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

श्रमदानात हजार हातांचे सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:45 PM

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने रविवारच्या सुट्टीचा आनंद लोकांनी ठिकठिकाणी श्रमदान करून लुटला. आर्वी तालुक्यातील बोदड येथील टेकडीवर वैद्यकीय जनजागृती मंच, बहार नेचर फाऊंडेशन, निसर्ग सेवा समिती, आपले सरकार इत्यादी स्वयंसेवी संघटनांनी तसेच गावकऱ्यांनी श्रमदान करून जवळपास ८०० मिटर सीसीटी तसेच दोन दगडी बांधाची निर्मिती केली.

ठळक मुद्देविविध सामाजिक संघटनांचा सहभाग : सीसीटी आणि दगडी बांधाची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने रविवारच्या सुट्टीचा आनंद लोकांनी ठिकठिकाणी श्रमदान करून लुटला. आर्वी तालुक्यातील बोदड येथील टेकडीवर वैद्यकीय जनजागृती मंच, बहार नेचर फाऊंडेशन, निसर्ग सेवा समिती, आपले सरकार इत्यादी स्वयंसेवी संघटनांनी तसेच गावकऱ्यांनी श्रमदान करून जवळपास ८०० मिटर सीसीटी तसेच दोन दगडी बांधाची निर्मिती केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी श्रमदानाला भेट देऊन कामाची पाहणी केली, तसेच उपस्थितांच्या प्रश्नांचे निराकरण केले.आर्वी तालुक्यातील टेंभरी येथे गावकरी आणि वर्धेतील मंगेश दिवटे यांच्या आदर्श कॉम्पुटर आणि नितेश कहार्ले यांच्या फिनिक्स करिअर अकादमीचे जवळपास १५० विद्यार्थी महाश्रमदानात सहभागी होते. शिवाय दखणे कुणबी समाजाचे १५ सदस्यही या कामांत सहभागी झाले. त्यांनी सीसीटी आणि ढाळीचे चर बनविले. या नागरिकांना गावापर्यंत नेण्याची व्यवस्था समीर देशमुख यांनी केली होती.परसोडी येथे गावकरी तसेच सक्षम स्वयंसेवी संस्थेतील दिव्यांगांनी श्रमदान केले. वर्धा पालिकेचे नगराध्यक्ष अतुल तराळे आणि सहकारी यांनीही श्रमदान करून सर्व उपस्थितांचा उत्साह वाढविला. जिल्हाधिकारी यांनी परसोडी येथे भेट देऊन कामाची पाहणी केली.सेलू तालुक्यातील बोरी कोकाटे या गावामध्ये ग्रामस्थ तसेच हिंगणी येथील शुभम सराफ तसेच मित्रपरिवार आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी श्रमदान केले. श्रमदान करता करता नागरिकांना वाघोबाचे दर्शनही घडले. श्रमदान सुरू असलेल्या ठिकानजवळूनच वाघ अचानक गेल्यामुळे श्रमदान करणाºयांत तरा भीती निर्माण झाली होती. सोबतच वाघ दिसल्याचा आनंद ही झाला. सेलू तालुक्यातील सोंडी हेटी येथे स्थानिक नागरिक तसेच वर्धेतील आधारवड या ज्येष्ठ नागरिकांच्या ३० लोकांच्या चमूने मिळून श्रमदान केले. त्यांना वाहतुकीची व्यवस्था दत्ता मेघे कॉलेज तर्फे करण्यात आली. वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांनी आर्वी तालुक्यातील चिंचोली या गावात भेट देत कामाची पाहणी केली. सर्वच गावांमध्ये शहरातून आलेल्या श्रमकºयांसाठी नाश्त्याची, थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विविध संघटनांना महाश्रमदानासाठी निशुल्क वाहतुकीची व्यवस्था फिरोज खान, गुड्डू पठाण, कृपलानी तसेच शहरातील नागरिकांनी उचलला.किन्हाळा (ज.) येथे श्रमदानतळेगाव (शा.पंत)- किन्हाळा (जसापूर) या गावातील नागरिकांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. त्याकरिता दररोज रात्री ९ ते १२ या ३ तासाच्या कालावधीत गावातील पुरुष, महिला, युवक, युवती श्रमदान करीत आहे. किन्हाळा गावात २०३ घरे असून लोकसंख्या ९०० च्या आसपास आहे. हा डोंगराळ भाग असून येथे पाण्याची समस्या आहे. यामुळे तरुणांनी गावात पाण्याची पातळी वाढविण्याच्या उद्देशाने या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला. श्रमदानातून तयांनी शेततळे, शोषखड्डे, दोन वनतलाव, ३ हजार वृक्षांची रोपवाटिका, सीसीटी बंधारे करण्याचा निर्धार केला आहे. सरपंच शालु दहिवडे, सचिव अविनाश कांबळे, सतीश रा. पठाडे, अविनाश अरुण दहिवडे, साक्षी पंडीत मानमोडे, राहुल लक्ष्मण नागोसे, सुरेखा गिºहाळे यांच्या सहकार्याने काम सुरू आहे.