शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

साडेसहा हजारावर मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:23 PM

लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघातून १४ उमेदवार रिंगणात होते. मतपत्रिकेवर १५ क्रमांकावर ‘नोटा’ हा पर्याय असल्याने तब्बल ६ हजार ५१० मतदारांनी या १४ ही उमेदवारांना नाकारुन ‘नोटा’ची बटन दाबली.

ठळक मुद्देअपक्ष उमेदवारांच्या मतापेक्षा ‘नोटा’ ची आघाडी : धामणगाव मतदारसंघात सर्वाधिक मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघातून १४ उमेदवार रिंगणात होते. मतपत्रिकेवर १५ क्रमांकावर ‘नोटा’ हा पर्याय असल्याने तब्बल ६ हजार ५१० मतदारांनी या १४ ही उमेदवारांना नाकारुन ‘नोटा’ची बटन दाबली. विशेषत: भाजप, काँग्रेस, बसपा व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला वगळता एकाही उमेदवाराला ‘नोटा’ इतके मताधिक्य मिळविता आले नाही.वर्धा लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, बसपा, वंचित बहूजन आघाडी, आंबेडकराईट पार्टी, रिपब्लीकन पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, लोकजागर पार्टी यांच्यासह सहा अपक्ष उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीदरम्यान मतदार संघातील १७ लाख ४१ हजार मतदारांपैकी १० लाख ७२ हजार ६५७ मतदारांनी आपला हक्क बजाविला. यापैकी १० लाख ६७ हजार १५८ मतदारांनी मशीनव्दारे मतदान केले. तर ५ हजार ४९९ मतदारांनी पोस्टल बॅलेटव्दारे मत नोदविले. या एकूण मतदानातून तब्बल ६ हजार ५१० मतदारांनी नोटाची बटन दाबून सर्व उमेदवारांप्रती नाराजी व्यक्त केली. या नोटांच्या मतापैकी ६ हजार ४०२ मतदान हे मशीनव्दारे करण्यात आले आहे. यापैकी धामणगाव विधानसभा मतदार संघात नोटाला सर्वाधिक तर देवळी मतदार संघात सर्वात कमी मतदान झाले. नोटाच्या मतामध्ये होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे.पोस्टल मतदानातुनही नोटाला पसंतीया लोकसभा निवडणुकीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह सैन्यदलात काम करणाऱ्यांनी पोस्टल व्दारे मतदान केले. पोस्टलव्दारे एकूण ५ हजार ४९९ मतपत्रिका प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८७ मत अवैध ठरले. इतकेच नाही तर या पोस्टल मतदानामध्ये १०८ मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. त्यामुळे पोस्टलव्दारे ५ हजार ३०४ मते वैध ठरले आहे.पोस्टलमधून सर्वांनाच मत ‘दान’पोस्टलव्दारे मतदान करुन मतदारांनी सर्व १४ उमेदवारांच्या पारड्यात काही ना काही मतदान टाकले. वैध ठरलेल्या ५ हजार ३०४ मतांपैकी सर्वाधिक २ हजार ८७६ मते भाजपाचे रामदास तडस तर १ हजार ९३० मते काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना मिळाली. त्यानंतर उर्वरित उमेदवारांना फुल ना फुलाची पाकळी देत सर्वांनाच खुश केले.यंदा मागील निवडणुकीच्या तुलनेत नोटाचा वापर दुपट्टीनेच वाढला आहे. तसेच पोस्टल बॅलेट पद्धतीनेही मतदान करणारे वाढल्याचे दिसते. असे असले तरी नोटाच्या वापरात होणारी वाढ चिंतेचीच ठरत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल