लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: नवी मुंबईहून वर्धा जिल्ह्यात आलेल्या तीन व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. सोबतच अमरावती जिल्ह्यातील उपचारासाठी आलेली युवतीसुद्धा कोरोना बाधित असल्याचे चाचणी अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधित्तांची संख्या ४ (पैकी १ मृत्यू) झाली असून एकूण ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहेआर्वी तालुक्यातील जामखुटा येथील ४ व्यक्तींचा परिवार मुंबईहून स्वत:च्या गाडीने परवानगी न घेता ९ मे ला निघाला. मुख्य रस्त्याने न येता आडमार्गाने ते ११ मे ला सकाळी आर्वीत दाखल झाले. त्यांना पोलिसांनी अडविले आणि आर्वी उपजिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांनंतर त्यांना जामखुटा येथील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आले.सदर बाधित रुग्ण ही कॅब चालक असून त्यांचा भाऊ हा प्रदीप मेंटल्स कंपनीत काम करतो. प्रतिबंधित भागातून आल्यामुळे ४ व्यक्तींचे स्त्राव नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी तीन नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एक पुरुष वय २८ वर्ष, महिला २५ वर्ष आणि अडीच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तीनही रुग्णावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बाधित रुग्णांना जेवण पुरविणारे त्यांचे आई- वडील, महिलेचा पती आणि इतर निकट संपर्कात आलेल्या अशा एकूण ६ व्यक्तीना आर्वी उपजिल्हा रुग्णालयात आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच लो रिस्कमध्ये असलेल्या ७ व्यक्तीना हैबतपुर येथे कोविड केअर सेंटरला विलगीकरणात ठेवले आहे.अमरावती जिल्ह्यातील तरुणी कोरोना बाधितयाचबरोबर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील २१ वर्षांची तरुणी तापाच्या उपचारसाठी सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालायत १६ मे रोजी दाखल झाली होती. तिचा कोरोना चाचणी अहवालही आज पॉझिटिव्ह आला आहे. तिच्यावर सावंगी येथे उपचार सुरू आहेत. या रुग्णाच्या संपर्कातील ४ व्यक्तीना सावंगी रुग्णालयातच आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.एकूण १७ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीलाजामखुटा येथील ६ तसेच सावंगी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या ४ तसेच डॉक्टर, वार्ड बॉय, आणि नर्स ७ असे एकूण १७ स्त्राव नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्ण; अडीच वर्षाच्या बालकाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 5:53 PM
नवी मुंबईहून वर्धा जिल्ह्यात आलेल्या तीन व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. सोबतच अमरावती जिल्ह्यातील उपचारासाठी आलेली युवतीसुद्धा कोरोना बाधित असल्याचे चाचणी अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधित्तांची संख्या ४ (पैकी १ मृत्यू) झाली असून एकूण ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ठळक मुद्दे६ व्यक्ती उपजिल्हा रुग्णालयात अलगीकरणात तर ७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणातअमरावती जिल्ह्यातील एक व्यक्ती कोरोना बाधितएकूण १७ व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांची चाचणी होणार