लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने अग्निहोत्री स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी वर्धाला चलित तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा २०१८-१९ चे आयोजन करण्यासाठी निवडले आहे. विशेष म्हणजे, यासाठी विदर्भातील केवळ तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या त्रि-दिवशीय चलीत तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचा समारोप २८ डिसेंबरला होणार आहे. याचा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजित पत्रपरिषदेत जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.अग्निहोत्री म्हणाले, तंत्र शिक्षणाविषयी संपूर्ण माहिती पालकांना व विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावी यासाठी या चलित तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण व अग्निहोत्री स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी वर्धा यांच्या वतीने संयुक्तरीत्या विद्यार्थी व महाविद्यालयांना आधुनिक युगामध्ये तंत्रशिक्षणाच्या पुढील संधी आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध अभ्यासक्रमांच्या माहितीबाबत तंत्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण, अनुतीर्ण विद्यार्थी हा आयुष्यातील पहिला महत्वाचा टप्पा ओलांडून अशा वळणावर उभा आहे. जेथे शिक्षणाच्या अनेक वाटा फुटतात व नेमका कोणता मार्ग निवडावा, याबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. गुणवत्ता असूनही माहितीअभावी संधी मिळत नाही. विद्यार्थी व पालकांना गोंधळ कमी होऊन त्यांना योग्य तो अभ्यासक्रम निवडणे सोपे व्हावे, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मेळाव्याला शंकरप्रसाद अग्निहोत्री, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळाचे सचिव डॉ. पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. २६ ला सकाळी १० वाजता अग्निहोत्री कॉलेज नागठाणा, दुपारी २ वाजता चन्नावार ई-विद्यामंदिर येळाकेळी, २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता समुद्रपूर तालुक्यातील तरोडा येथील हरिकृपा मंगल कार्यालय, दुपारी २ वाजता भारत विद्यालय वेळा, ता. हिंगणघाट तर २८ रोजी सकाळी ११ वाजता माहेर मंगल कार्यालय सेलू आणि दुपारी २ वाजता काकडे महाराज मठ येथे मार्गदर्शन मेळावा पार पडणार आहे. शिक्षण क्षेत्रात वाटा शोधताना विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणाची कास धरली पाहिले. सध्या विविध प्रकारचे शिक्षण आपल्या दारी आले असून योग्य शिक्षणाची तरुणांनी निवड केल्याचे त्यांचे भविष्य उज्वल होईल. या मार्गदर्शन मेळाव्यातून पालकांसह विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत, असेही सांगितले. पत्रकार परिषदेला प्रा. चंद्रकांत कोठारे, प्राचार्य डॉ. धर्मेंद्र मुंदडा, प्रा. राजकिशोर तुगनायत, प्रा. प्रमोद गिरडकर यांची उपस्थिती होती.
तरुणांसाठी तीनदिवसीय चलित तंत्रशिक्षण मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:09 PM
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने अग्निहोत्री स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी वर्धाला चलित तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा २०१८-१९ चे आयोजन करण्यासाठी निवडले आहे. विशेष म्हणजे, यासाठी विदर्भातील केवळ तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. २
ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री यांची माहिती : विदर्भातील केवळ तीन संस्थांची निवड