लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाने पाठ फिरविल्यामुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. जलसाठ्यातील पाणी पातळी लक्षात घेता; वर्धा शहरासह लगतच्या अकरा गावांमध्ये तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला. येत्या १ डिसेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे.स्थानिक नगरपालिकेत नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या अध्यक्षतेखाली गुुरुवारला पाणी पुरवठ्याबाबत तिसरी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नगर पालिकेचे सभापती संदीप त्रिवेदी, अभियंता नंदनवार, सुजित भोसले यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (ग्रामीण) चे अधिकारी तसेच सिंचन विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. वर्धा शहरासह लगतच्या अकरा ग्रामपंचायतीमध्ये येळाकेळी व पवनार येथून पाणी पुरवठा केल्या जातो. या दोन्ही ठिकाणी महाकाळीच्या धामनदी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या धामनदी जलाशयात केवळ २८ टक्के म्हणजेच १७. ३२ एम.एम.क्यू. पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे येथील जलसाठ्यातून मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पाण्याची गरज भागविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीत शहरासह ग्रामीण भागातही तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासंदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ डिसेंबरपासून होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता वर्धेकरांसह ग्रामीण नागरिकांनाही पाणीबाणी सहन करावी लागेल.येळाकेळी व पवनार येथून पाण्याची उचलशहराला नगरपालिकेच्यावतीने तर लगतच्या अकरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व्दार पाणीपुरवठा केला जातो. शहरासह ग्रामीण भागाकरिता महाकाळीच्या धामनदी जलाशयातून पाणी उपलब्ध होते. शहराकरिता येळाकेळी आणि पवनार येथून पाणीपुरवठा केल्या जातो. तर ग्रामीण भागामध्ये येळाकेळी येथूनच पाणीपुरवठा होतो. महाकाळी जलाशयातून पाणी सोडल्यानंतर येळाकेळीपर्यंत पाणी येण्याकरिता साधारणत: ३८ तासाचा कालावधी लागतो. या एकाच ठिकाणाहून शहर आणि ग्रामीणसाठी पाण्याची उचल होते. पवनार येथे पाणी पोहोचण्याकरिता अडीच ते तीन दिवसांचा कालावधी लागतो आणि पाण्याची क्षमताही जास्त असावी लागते. पण, सध्या जलाशयातील पाणी पातळी चिंतणीय असल्याने नगरपालिका प्रशासन, जीवन प्राधिकरण व सिंचन विभागाने याबाबत उपाययोजनांची आखणी केली आहे. आता त्याला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.नागरिकांनी पाणी बचतीचा संकल्प करुन आता तरी पाण्याचा अपव्यय टाळावा. विनाकारण वाया जाणारे पाणी वाचवून आपल्या भविष्याचा विचार करावा. नळाचे पाणी पिण्याकरिता तसेच आवश्यक तेवढेच वापरावे. इतर गरजांकरिता बोरवेल व विहिरीच्या पाण्याचा वापर करुन पालिकेला सहकार्य करावे.अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धासंभावित उपाययोजनामार्चपर्यंत शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी पुरविण्याच्या दृष्टीकोणातून संभाव्य उपाययोजनाही करण्यात आल्या आहे.पालिका क्षेत्रातील जुन्या सार्वजनिक विहिरी साफ करुन परिसरात त्यातून पाणी पुरवठा करण्यात येईल.आवश्यकता पडल्यास विंधन विहिरीची निर्मिती करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.शहरातील नागरिकांची पाणी समस्या लक्षात घेऊन ट्रँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भातही पालिकेने विचार केला असून मार्च अखेरपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्याची धडपड सुरु आहे.
तीन दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 9:46 PM
पावसाने पाठ फिरविल्यामुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. जलसाठ्यातील पाणी पातळी लक्षात घेता; वर्धा शहरासह लगतच्या अकरा गावांमध्ये तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.
ठळक मुद्देतिसरी आढावा बैठक : पालिकेत नगराध्यक्षांच्या उपस्थितीत झाला निर्णय