लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रविवार वर्धेकरिता अपघातवार ठरला. रविवारी सकाळी दोन तर शनिवारी रात्रीच्या सुमारास एक अपघात झाला. या तीन अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर अन्य एका अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. तीन अपघातापैकी दोन ठिकाणी अपघात होताच दोन गाड्या जळाल्या.या तीन अपघातांपैकी केळझर नजीक झालेला अपघात भीषण ठरला. या अपघातात जीपने भडका घेतला. दरम्यान वाहनात फसून असलेल्या एकाचा आगेत होरपळून जागीच मृत्यू झाला. तर कापसाचा चुकारा घेवून घरी जात असलेल्या शेतकरी पुत्राला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चिकणी येथे मामाला भेटून येत असलेल्या भाच्याच्या कारला अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला आहे.जीपमध्ये जळून एकाचा कोळसालोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : नागपूर राज्य मार्गावर असलेल्या केळझरनजीक सामाजिक वनीकरण सामोरच्या कडुलिंबाच्या झाडाला जबर धडक दिल्याने शॉट सर्किटमुळे जीप पेटली. यात वाहनात बसून असलेल्या एकाचा जळून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. अनिल राठोड, रा. यवतमाळ असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.घटनास्थळाहून चालक बेपत्ता असल्याने या वाहनात किती जण होते, मृत नेतका कोण, वाहन कुणाचे अशा अनेक बाबींचा खुलासा होणे बाकी आहे. या प्रकरणी सिंदी (रेल्वे) पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.सिंदी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाºया सामाजिक वनीकरण समोर आज पहाटे नागपूर कडून वर्धेच्या दिशेने जाणाºया जीप गाडीचा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ते कडुलिंबाच्या झाडावर जाऊन धडकले. धडक इतकी जबर होती की वाहनाचा डावा भाग पूर्णत: क्षतिग्रस्त झाला.यातच वाहनाने शॉट सर्किटमुळे पेट घेतला. चालकाच्या बाजूला बसून असलेली व्यक्ती त्यात फसल्याने त्याचा जागीच त्याचा जळून मृत्यू झाला. चालकाने घटनास्थळावरुन पळ काढल्याने वाहनात किती व्यक्ती होते, याची माहिती वृत्तलिहिस्तोवर मिळू शकली नाही.
तीन अपघातात दोन ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:26 PM
रविवार वर्धेकरिता अपघातवार ठरला. रविवारी सकाळी दोन तर शनिवारी रात्रीच्या सुमारास एक अपघात झाला. या तीन अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर अन्य एका अपघातात एक जण गंभीर जखमी झाला.
ठळक मुद्देरविवार ठरला अपघातवार : दोन वाहने पेटली