दोघे निर्दोष : मृतक अर्भक स्त्रीलिंगीवर्धा : अनैतिक संबधातून गर्भधारणा होवून बदनामीच्या भीतीने गर्भपात करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या कुमारी मातेला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या महिलेचे नाव सविता रमेश आबझरे रा. देवळी असे आहे. तर यात तिच्यासह असलेल्या अन्य दोघांना निर्दोष मुक्त करण्यात आले. हा निकाल येथील सत्र न्यायाधीश संध्या रायकर यांनी गुरुवारी दिला. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, १३ नोव्हेंबर २०१२ रोजी सोमनाथे ले-आऊट सिंदी (मेघे) येथे एक अर्भक मृतावस्थेत आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी महिलेविरूद्ध भादंविच्या कलम ३१५, ३१८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सविता रमेश आबझरे (२५) रा. देवळी, योगेश उकंठराव कर्णाके (३५) रा. आंजी (मोठी), मंदा योगेश कर्णाके रा. आंजी (मोठी) या तिघाना अटक केली. प्रकरणाचा तपास पुर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरण साक्ष पुराव्याकरिता सत्र न्यायाधीश संध्या सायकर यांच्या न्यायालयात आले. प्रकरणाचा युक्तीवाद करताना सहायक शासकीय अभियोक्ता श्याम दुबे यांनी साक्षदारांचे बयाण व पितृत्त्व विश्लेषकांच्या अहवालावरून सविताच मृत बाळाची आई असून तिला कठोर शिक्षेचा युक्तीवाद केला.न्यायाधीश रायकर यांनी दोन्ही पक्षाच्या बयानांतर सविता रमेश अंबाझरे हिला कलम ३१५ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. उर्वरीत दोघांना दोषमुक्त करण्यात आले. प्रकरणात शासनातर्फे अॅड. श्याम दुबे यांना अॅड. रूची तिवारी व अॅड. प्रणाली आगलावे व पोलीस हवालदार राजू माळोदे, नरेंद्र भगत यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
गर्भपात करून अर्भकाला फेकणाऱ्या कुमारी मातेला तीन वर्षे सश्रम करावास
By admin | Published: March 18, 2016 2:23 AM