आॅनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्यातील काही नगर पालिका, नगर पंचायती व ग्रामपंचायतींनी अद्यापही शासन निर्णय असताना दिव्यांगांचा तीन टक्के निधी खर्च केलेला नाही. यामुळे सदर निधीचे दिव्यांगांना वाटप व्हावे, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेद्वारे करण्यात आली. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन देण्यात आले.प्रहार अपंग क्रांती संघटनेने आजपर्यंत अनेकदा निवेदने दिली. आंदोलन केली; पण अद्यापही तीन टक्के निधी खर्च केला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्वांगीण विकासापासून दिव्यांगांना वंचित ठेवल्याचे निदर्शनास येत आहे. हा निधी शासकीय मदतीचा हक्क देण्यासाठी खर्च करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत शासन निर्णय असताना याची अंमलबजावणी केली जात नाही. अनेक ग्रा.पं., न.पं. व पालिकांनी हा निधी अद्यापही खर्च केलेला नाही. याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्या. शहराला लागून असलेल्या सिंदी (मेघे) ग्रा.पं. तथा सेलू नगर पंचायतीने अद्याप कुठलाच निधी खर्च केलेला नाही. याबाबत संबंधितांना वारंवार निवेदने दिली; पण कार्यवाही झत्तली नाही. येत्या आठ दिवसात आपल्या स्तरावरून सूचना देत विकास निधी खर्च करावा, अन्यथा प्रहारतर्फे त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल. याला जिल्हा प्रशासन व संबंधित ग्रामपंचायत, नगर पंचायत व नगरपरिषद जबाबदार राहील. त्या काळात होणाºया कोणत्याही अनूचित प्रकारास शासन जबाबदार राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले.अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना विकास दांडगे, महेंद्र इखार, विजय सुरकार, अजय चंदनखेडे, आदित्य कोकडवार, पवन दंदे, नितेश चातुरकर, चेतन वैद्य, शुभम भोयर, भूषण येलेकर, प्रशिल धांदे, उमेश गुरनूले आदी उपस्थित होते.
दिव्यांगांचा तीन टक्के निधी अद्यापही अखर्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:40 PM
जिल्ह्यातील काही नगर पालिका, नगर पंचायती व ग्रामपंचायतींनी अद्यापही शासन निर्णय असताना दिव्यांगांचा तीन टक्के निधी खर्च केलेला नाही.
ठळक मुद्देकारवाईची मागणी : प्रहारचे जिल्हा प्रशासनाला निवेदन