खापरी-घोराड मार्गावरील उखडलेल्या गिट्टीमुळे अपघाताची भीती घोराड : नागरिकांसह वाहनचालकांची समस्या लक्षात घेता घोराड ते खापरी या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु, सध्या हे काम थंडबस्त्या पडल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील उखडलेली गिट्टी मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाहीची गरज आहे. आठ महिन्यांपूर्वी सदर मार्गाच्या रूंदीकरणासह मजबुतीकरण व डांगबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. सुरूवातीला रस्त्याच्या कडेला खोदकाम करून त्यात मुरूम व इतर साहित्य टाकण्यात आले. परंतु, बराच कालावधी लोटूनही नव्याने केलेल्या कामावर डांबरीकरण करण्यात आले नाही. सध्या हीच नव्याने टाकलेली गिट्टी ठिकठिकाणी उखडली असल्याने सदर प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. ३ कि.मी अंतराच्या रूंदीकरणाच्या कामाला मे महिण्यात सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम करून त्यात आवश्यक मुरुम व गिट्टीचा भर देत मजबूतीकरणाचे काम जुन महिण्याच्या अखेरपर्यंत करण्यात आले. परंतु, पावसाळ्याच्या कालावधीत थांबलेले काम आठ महिन्याचा कालावधी लोटूनही पुन्हा सुरू झाले नाही. सध्या रस्त्याच्या बाजुची खडी उखडली पडली आहे. ती मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असून वाहने नादुरूस्त होत असल्याने वाहनचालकांना कमालीचा त्रास होत आहे. याकडे लक्ष देत कारवाईची मागणी आहे.(वार्ताहर) त्या सूचनांकडेही दुर्लक्ष रस्ता रूंदीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रस्त्याला आडव्या जाणाऱ्या वितरीका व पाठचऱ्या सिमेंट पायल्या टाकूण सुसज्ज करण्यास कंत्राटदाराला सांगितले होते. परंतु, रूंदीकरण व मजबूतीकरण करताना देण्यात आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सदर प्रकारामुळे अधिकारी व कंत्राटदाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधीतांनी योग्य पावले उचलून नागरिकांची समस्या निकाली काढण्याची मागणी आहे.
रुंदीकरणाचे काम थंडबस्त्यात!
By admin | Published: February 05, 2017 12:44 AM