वर्धा : लोकसभा निवडणूक प्रक्रि येत मतांच्या आकडेवारीत तफावत दिसून येत असल्याने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.वर्धा लोकसभा मतदार संघातील अंतिम मतदानाची संख्या १० लाख ६५ हजार ७७८ दर्शविण्यात आली आहे.परंतू २३ मे च्या मतमोजणीमध्ये सर्व उमेदवारांना एव्हीएममध्ये मिळालेल्या मतांची एकूण आकडेवारी १० लाख ६७ हजार १५८ दर्शविण्यात आली. या दोन्ही प्रपत्राच्या एकूण आकडेवारीमध्ये १३८० मतांचा फरक आढळून येत आहे. यावरुन निवडणूक प्रक्रि येत घोळ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी तसेच ही निवडणूक प्रक्रिया पुन्हा घेण्याकरिता निवडणूक आयोगाला कळवावे, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष मनोज चांदुरकर, तालुका अध्यक्ष धर्यशील जगताप, शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, मिलिंद मोहोड, सतिश लांबट, सचिन कोटंबकार, सुनील वरघने, विपीन राऊत यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.मतदान प्रक्रियेदरम्यान मतदानाची आकडेवारी नोंदवितांना काही ठिकाणी चुुका झाल्या. पण, इव्हिएम मध्ये असलेले मत अंतिम असल्याने यात कुठलाही घोळ झालेला नाही. झालेले मतदान आणि मतमोजणीदरम्यानची आकडेवारी सारखी आहे.-विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी.
लोकसभा निवडणूक प्रक्रियेत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 10:39 PM
लोकसभा निवडणूक प्रक्रि येत मतांच्या आकडेवारीत तफावत दिसून येत असल्याने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. वर्धा लोकसभा मतदार संघातील अंतिम मतदानाची संख्या १० लाख ६५ हजार ७७८ दर्शविण्यात आली आहे.
ठळक मुद्देचौकशीची मागणी : कॉँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन