शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

रस्त्यावर तूर फेकून सीएमचा निषेध

By admin | Published: May 06, 2017 12:33 AM

तुरीचा अखेरचा दाणा खरेदी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होेते. वास्तविकतेत शासकीय तूर खरेदी बंद झाल्याने तूर उत्पादकांवर संकट ओढवले आहे.

शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रोहण्यात स्थानबद्ध आर्वी : तुरीचा अखेरचा दाणा खरेदी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होेते. वास्तविकतेत शासकीय तूर खरेदी बंद झाल्याने तूर उत्पादकांवर संकट ओढवले आहे. अनेक शेतकऱ्यांची तूर घरीच आहे. त्यांच्या या वक्तव्याचा आणि शासकीय धोरणाचा निषेध नोंदविण्याकरिता शुक्रवारी संतप्त तूर उत्पादकांनी मुख्यमंत्र्यांचा काफीला आर्वीत दाखल होताच तूर फेकून निषेध नोंदविला. पोलिसांनी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आर्वीत स्थानबद्ध केले. आर्वीत मुख्यमंत्री दाखल होताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक ते बसस्थानक परिसरातील या मुख्य रस्त्यावर तूर फेकून शासनाच्या तूर खरेदी योजनेचा निषेध नोंदविला. आर्वीतील नाफेडने खरेदी केलेल्या तुरीत व्यापाऱ्याची तूर अधिक आहे. व्यापाऱ्याच्या तुरीचा काटा आधी करून शेतकऱ्यांचा माल अद्यापही काटा न झाल्याने शेतकऱ्यांच्या तूर खरेदीबाबत शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे शेतकरी म्हणाले. आर्वीच्या रस्त्यावर शेतकरी संघटना व प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर तूर फेकून शासनाच्या तूर खरेदीचा निषेध नोंदविला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून सायंकाळी सुटका केली तर प्रहारचे अध्यक्ष बाळा जगताप यांनी आर्वीत मुख्यमंत्री येण्यापूर्वीच ताब्यात घेऊन सायंकाळी सोडण्यात आले. रोहण्यात तुरीच्या मुद्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार होते. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांना रोहणा येथे स्थानबद्ध करण्यात आले. यात जि.प. सदस्य ज्योती निकम, माजी जि.प. सदस्य गजानन निकम, उपसरपंच मंगेश मानकर, महेंद्र मानकर यांच्यासह शेतकऱ्यांचा समावेश होता.(तालुका प्रतिनिधी)