आॅनलाईन लोकमतवर्धा: कारंजा घाडगे तालुक्यातील अंभोरा येथे गुरुवारी रात्री गणपत उईके यांच्या गोठ्यात शिरून गोठ्यातील बकरीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. आवाज येताच मालक गणपत उईके याच्यासह गावकरी धावले असता वाघ पळून गेला. यात बकरी जखमी होवून जागीच मरण पावली. वाघ पट्टेदार असून वयाने लहान होता.अंभोरा हे गाव बोर व्याघ्र प्रकल्पापासून ८ ते १० कि़मी. आहे. या प्रकल्पातील वाघ बाहेर येतात आणि शिकारीसाठी गावात शिरतात. नरभक्षीण वाघीण १४ आॅक्टोबर २०१७ विजेच्या धक्क्याने मृत झाल्याची घटना याच भागात घडली. गाव छोटे असून लोकसंख्या ३२५ आहे. जंगली श्वापदाकडूनही शेतमालाचे सतत नुकसान केले जात आहे. घटनेची माहिती मिळताच सकाळी वनरक्षक पवार यांनी घटनास्थळाला भेट देत रेंजर तळणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात वाघाने गावात येऊन पाडला बकरीचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 10:15 AM
कारंजा घाडगे तालुक्यातील अंभोरा येथे गुरुवारी रात्री गणपत उईके यांच्या गोठ्यात शिरून गोठ्यातील बकरीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. आवाज येताच मालक गणपत उईके याच्यासह गावकरी धावले असता वाघ पळून गेला. यात बकरी जखमी होवून जागीच मरण पावली.
ठळक मुद्देगावकऱ्यांमध्ये वाघाची दहशतजंगली श्वापदांकडून शेतमालाचे नुकसान