आॅनलाईन लोकमतआकोली : खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद बिटातील जनार्दन कोरचे यांच्या शेतात गत चार दिवसांपासून वाघाच्या नर-मादी जोडीने आपला मुक्काम ठोकला आहे. वाघाच्या भीतीने शेतकरी शेतात जात नसल्याने कामे प्रभावित झाली आहेत. वनविभागाच्या कर्मचाºयांनी फटाके फोडले की वाघाची जोडी जंगलात जाते व परत त्याच ठिकाणी येत आहे.प्रारंभी वनविभागाने ही वाघिण बोर व्याघ्र प्रकल्पातील कॅटरिना असल्याचे सांगितले होते; पण आता मात्र ग्रामस्थ व वनविभागाच्या पाहणीत येथे वाघाची जोडी आढळून आली. यामुळे नेमके कोणते वाघ व वाघिण आहे याबाबत संभ्रमावस्था आहे. सदर जंगलात कॅटरिना, बाजीराव, टिंकी, युवराज, कॅटरिनाचे २ वर्षीय तीन बछडे व अन्य वाघाचे वास्तव्य आहे. गत पाच दिवसांपासून सुरेश कोरचे व जनार्दन कोरचे यांच्या शेतात नर-मादिचे वास्तव्य आहे. ग्रामस्थांनी ही बाब वन विभागाला कळविल्यानंतर दररोज वनपथक येवून फटाके फोडतात. त्यामुळे नर-मादीची ही जोडी जंगलात आश्रयाला जातात व फटाक्याचे आवाज बंद झाले की परत शेतात येतात.याबाबत क्षेत्र सहाय्यक दिनकर पाटील म्हणाले की, हा त्यांचा बहुतेक मिलनाचा प्रयत्न असावा, त्यामुळे ते जोडीने थांबले असावे. शिवारातील सुरेश कोरचे, जनार्दन कोरचे, बंडु आडे, तुळसीराम नागोसे, मारोतराव निकोडे, पांडुरंग ठाकरे, निखील काकडे या शेतकºयांनी वाघाच्या दहशतीने शेतात जाणे बंद केले. वेचणीला आलेला कापूस वेचणी करता आला नाही. तुरीचे पीक काढणीला आले आहे. सवंगणी खोळंबली आहे. याशिवाय चना, गहू या रबी पिकांना ओलित करता येत नसल्याने पीक हातचे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कायम संकटाशी झुंज देणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांपुढे नवे संकट घोंगावत आहे. वाघ नर-मादीची जोडी पुन्हा किती दिवस येथे ठिय्या मांडणार याबाबत कुणीही सांगत नसल्याने शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे. या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.शेतकऱ्यांवर नवे संकटपेरणीच्या हंगामात नरभक्षी वाघिणीच्या दहशतीच्या सावरात सापडलेले शेतकरी तिच्या दहशतीतून सावरत नाही तो नवे संकट उभे टाकले आहे. वाघांच्या वास्तव्यामुळे शेतीकामाचा विचका झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय या विचाराने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. ही जोडी नेमकी कोणत्या नर-मादीची आहे. याबाबत वनविभागात संभ्रम आहे.
पाच दिवसांपासून वाघांचा शेतात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:32 PM
खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद बिटातील जनार्दन कोरचे यांच्या शेतात गत चार दिवसांपासून वाघाच्या नर-मादी जोडीने आपला मुक्काम ठोकला आहे.
ठळक मुद्देशेतीची कामे प्रभावित : वनविभाग फोडताहेत केवळ फटाके