लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हमी भावाच्या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांची तूर शासकीय खरेदी यंत्रणा म्हणून ओळख असलेल्या नाफेडला दिली. नियमानुसार दहा दिवसांच्या आत चुकारे देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना तब्बल दीड महिना चुकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागली. आजच्या स्थितीत अजूनही २८.२४ कोटी रुपयांचे थकले आहे. यामुळे शेतकऱ्यांना या चुकाºयाकरिता आणखी बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत २९ कोटी ७२ लाख २९ हजार १०२ रुपयांची तूर खरेदी झाली. मात्र या चुकाऱ्यापोटी जिल्ह्यातील केवळ ११८ शेतकऱ्यांनी चुकाऱ्यापोटी ६२ लाख ७१ हजार २५३ रुपये मिळाले असल्याची माहिती आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना लवकरच चुकारे मिळतील असे सांगण्यात येत आहे. खरेदी प्रमाणे चुकारेही आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. यामुळे पूर्ण चुकारे होण्याकरिता आणखी किती दिवस लागतील हे सांगणे कठीण आहे.यंदाचा खरीप हंगामात कापूस गेल्याने शेतकऱ्यांना तुरीपासून लाभ होईल असे वाटले होते. उत्पादन निघण्याच्या काळातच वातावरणात बदल झाल्याने तुरीच्या उत्पादनात कमालीची घट झाली. यातच शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच भाव पडण्याचा अलिखित नियम कायम राहिल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून हमी भावापेक्षा कमी दरात तूर खरेदी झाली. यामुळे शेतकऱ्यांकडून शासकीय खरेदीचे केंद्र सुरू करण्याची मागणी झाली.शेतकऱ्यांच्या मागणीअंती जिल्ह्यात सात केंद्रावरून तूर खरेदी झाली. यात एकूण २९ कोटी ७२ लाख २९ हजार १०२.५० रुपयांची तूर खरेदी झाली. मात्र शेतकऱ्यांना चुकाऱ्यांकरिता प्रतीक्षा करावी लागली. अनेक सामाजिक संघटनांकडून शासनाला निवेदन देत शेतकऱ्यांचे अडलेले चुकारे देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यात आता चुकारे मिळणे सुरू झाले असून जिल्ह्यात केवळ ११८ शेतकऱ्यांना ६२.७१ लाख रुपये मिळाले आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना अद्याप प्रतरक्षा करावी लागणार असल्याचे दिसून आले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या तुरीची नोंद नाहीजिल्ह्यात गोदामाची समस्या निर्माण झाल्याने बरीच तूर अद्यापही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातच पडून आहे. ही तूर नाफेडच्या गोदामात गेली नाही. यामुळे या शेतकऱ्यांच्या तुरीची नोंद नाफेडकडे झाली नाही. परिणामी, त्यांच्या तुरीची अद्याप नाफेडकडे नोंद झाली नाही. यामुळे त्यांच्या चुकाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. यातच आता गोदामाची समस्या निर्माण झाल्याने त्यांच्या तुरीची नोंद केव्हा होईल, हे सांगणे कठीण आहे.गोदामाच्या समस्येत जिल्ह्यात चणा खरेदीला प्रारंभजिल्ह्यात तुरीची खरेदी सुरू असतानाच तीन केंद्रावरून चण्याची खरेदी सुरू झाली आहे. तुरीच्या खरेदीमुळे शासकीय गोदात फुल्ल असल्याने खरेदी झालेला चणा कुठे ठेवावा, अशा विवंचनेत जिल्ह्याची खरेदी यंत्रणा आहे. यामुळे शेतकऱ्यांची होरपळ होत असून त्यांना गरजेपोटी व्यापाऱ्यांना कमी दरात चणा द्यावा लागत आहे. चण्याचा शासकीय दर ४ हजार ४०० रुपये असताना व्यापाºयांना साडेतीन हजाराच्या आसपास चणा विकावा लागत आहे.केवळ २२२ शेतकऱ्यांची नोंदणीशासनाला चणा देण्याकरिता शेतकरी पाठ दाखवित असल्याचे दिसून आले आहे. शेतमालाची आॅनलाईन पद्धतीने खरेदी होत असली तरी आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २२२ शेतकऱ्यांनीच नोंद केल्याची माहिती आहे.
तुरीचे २८.७२ कोटींचे चुकारे अद्याप थकितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:54 PM
हमी भावाच्या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांची तूर शासकीय खरेदी यंत्रणा म्हणून ओळख असलेल्या नाफेडला दिली. नियमानुसार दहा दिवसांच्या आत चुकारे देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना तब्बल दीड महिना चुकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागली. आजच्या स्थितीत अजूनही २८.२४ कोटी रुपयांचे थकले आहे.
ठळक मुद्दे११८ शेतकऱ्यांना मिळाले ६२.७१ लाख रुपये : इतर शेतकºयांना अद्याप रकमेची प्रतीक्षाच