लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: भारतीय इतिहासात महिलांचे कार्य व योगदान उल्लेखनीय असेच राहिले आहे. यात एक नाव सुवर्ण अक्षरात कोरावे असे आहेत ते म्हणजे कस्तुरबा गांधी होय. त्या कट्टर धार्मिक, निरक्षरता आणि परंपरावादी असतानाही वैवाहिक जीवन ते स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे कार्य सदैव उल्लेखनीय असेच राहिलेले आहेत. त्या महान विदुषी कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखाँ पॅलेस मध्ये २२ फेब्रुवारी १९४४ ला बंदिवासात निधन झाले. आज त्यांचा ७५ वा स्मृती दिन. आश्रमात मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो.परंपरेप्रमाणे बांचा बालविवाह झाला. गांधीजींना शिक्षणामुळे बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. त्यामुळे शिक्षणाचे महत्व समजले. अशिक्षित कस्तुरबाला साक्षर करण्याचा प्रयत्न गांधीजींनी सुरू केला. पण घरातील वातावरणामुळे मात्र त्यांना शिकविण्यात अडचणी निर्माण व्हायला लागल्या.अशा परंपरांना गांधीजींनी कलंकित म्हटले. पण प्रयत्न सतत सुरू राहिले.दक्षिण आफ्रिकेतील कार्यामुळे गांधीजींची ओळख व्हायला लागली. पण या कामात त्यांना कस्तुरबांची साथ महत्वाची राहिली आहे. सार्वजनिक जीवनाचा प्रयोग एकांगी यशस्वी होऊ शकत नाही याची जाणीव बापूंना होती. त्यासाठी त्यांनी बांना तयार करायला सुरूवात केली. बा कट्टर धार्मिक होत्या. परंपरा जपणाºया होत्या. यातून बा बापूंचा वाद विवाद होत असे. भांडणे पण होत. बा बापू पेक्षा सहा महिने मोठ्या असल्याने नेहमीच आपला अधिकार दाखवीत. त्या हट्टी असल्याने बापूंना विचार व कार्य गळी उतरविणे कठीण जात असे. पण गांधीजींनी कधी हार माणली नाही आणि प्रयत्न पण सोडला नाही. याचा परिणाम असा झाला की बा घडायला लागल्या. समजायला लागल्या. त्या बापूंच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालायला लागल्या. बापूंनी जे कार्य हाती घेतले त्या कामात बां चे योगदान होते. मी जे कार्य करू शकलो जीवनात यशस्वी झालो ते बा च्या सहकार्यामुळेच असे गांधीजींने म्हटले आहे.गांधीजींचे जीवन,विचार, कार्य समाज, राष्ट्र व मानवतेसाठी होते. तत्वावर व समानतेवर आधारित बापू जीवन जगत होते. एवढेच नाही तर या साठी देश स्वातंत्र्य लढ्यासाठी ३० एप्रिल १९३६ मध्ये बापू सेवाग्राम या गावी आले. आश्रमची स्थापना करण्यात आली. त्या वेळी त्यांच्या सोबत बा, बलवंत सिंग, मुन्नालाल शाह, अब्दुल गफ्फार खाँ, मीराबहन इ.होते. आश्रमीय जीवन पध्दती अंगिकारल्याने स्वतंत्र व व्यक्तिगत असे काहीच नव्हते. अशाही परिस्थितीत त्यांनी बापूंना साथ दिली हे महत्वाचे.प्रात:प्रार्थना, श्रमदान, रसोडा, वाचन, सूतकताई, सायं.प्रार्थना, सण, ऊत्सव, आश्रमातील अतिथी विशेषता महिला व मुलींची जबाबदारी बा कडेच असायची. त्या सुध्दा तेवढेच मायेने सर्वांची काळजी घेत असे. आश्रमात रामायन,गीता,काही पत्रिकांचे त्या नियमित वाचन करी.बिनोबांनी त्यांना बारावा अध्याय शिकविला होता.संत तुकाराम, संत नामदेव, रामकृष्ण परमहंस या महापुरूषांनी आपल्या पत्नीला जे स्थान दिले होते तेच स्थान बापूंनी बा ला दिले होते. ब्रम्हचर्य अंगिकारल्यानंतर बापू कस्तुरबांना बा म्हणत. त्यांनी हे मैत्रीचे नवे नाते निर्माण केले आणि अखेरपर्यंत प्राणपणाने जपले. आश्रमात येणारे राष्ट्रीय स्तरावरील नेते बा ना आवर्जून भेटत चर्चा करीत असे. यात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजनी नायडू, राजेंद्र प्रसाद इ.सह अन्य नेते मंडळीचा समावेश होता.१९४२ चा ठराव आदिनिवास मध्ये झाला. करा व मरा चा नारा देशवासियांना दिला. मुंबईतील गोवालिया टँकवर ९ आॅगष्ट १९४२ ला सत्याग्रह सभा ठरली. ५आँगष्ट रोजी बा बापूसोबत मुंबईसाठी रवाना झाल्या. जाण्याअगोदर त्यांनी आश्रमात बकुळीचे झाड लावले होते. सभेअगोदरच बापूसह अन्य नेत्यांना सरकारने अटक केली. सभेला कस्तुरबांनी संबोधित केले. ऊर्जा निर्माण करून आंदोलनाची धार वाढविली. बांना अटक करून आगाखाँ पॅलेसमध्ये ठेवण्यात आले. तिथे त्यांची तब्बेत बिघडली. बापूंनी सेवा केली पण यश आले नाही. अखेर २२ फेब्रुवारी १९४४ रोजी त्यांचे निधन झाले.कस्तुरबांचे आश्रमातील बा कुटीत सहा वर्षांचे वास्तव्य राहिले आहे. त्यांचे साहित्य जपून ठेवण्यात आले आहे. दर वर्षी मातृदिनी त्यांनी लावलेल्या बकुळीच्या झाडाखाली सभा घेऊन त्यांचे स्मरण केले जाते.
स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरक कार्यकर्त्या कस्तुरबा गांधी यांचा आज ७५ वा स्मृती दिनलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: भारतीय इतिहासात महिलांचे कार्य व योगदान उल्लेखनीय असेच राहिले आहे. यात एक नाव सुवर्ण अक्षरात कोरावे असे आहेत ते म्हणजे कस्तुरबा गांधी होय. त्या कट्टर धार्मिक, निरक्षरता आणि परंपरावादी असतानाही वैवाहिक जीवन ते स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे कार्य सदैव उल्लेखनीय असेच राहिलेले आहेत. त्या महान विदुषी कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखाँ पॅलेस मध्ये २२ फेब्रुवारी १९४४ ला बंदिवासात निधन झाले. आज त्यांचा ७५ वा स्मृती दिन.हा दिन सेवाग्राम आश्रमात मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो.परंपरेप्रमाणे बांचा बालविवाह झाला. गांधीजींना शिक्षणामुळे बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. त्यामुळे शिक्षणाचे महत्व समजले. अशिक्षित कस्तुरबाला साक्षर करण्याचा प्रयत्न गांधीजींनी सुरू केला. पण घरातील वातावरणामुळे मात्र त्यांना शिकविण्यात अडचणी निर्माण व्हायला लागल्या.अशा परंपरांना गांधीजींनी कलंकित म्हटले. पण प्रयत्न सतत सुरू राहिले.दक्षिण आफ्रिकेतील कार्यामुळे गांधीजींची ओळख व्हायला लागली. पण या कामात त्यांना कस्तुरबांची साथ महत्वाची राहिली आहे. सार्वजनिक जीवनाचा प्रयोग एकांगी यशस्वी होऊ शकत नाही याची जाणीव बापूंना होती. त्यासाठी त्यांनी बांना तयार करायला सुरूवात केली. बा कट्टर धार्मिक होत्या. परंपरा जपणाºया होत्या. यातून बा बापूंचा वाद विवाद होत असे. भांडणे पण होत. बा बापू पेक्षा सहा महिने मोठ्या असल्याने नेहमीच आपला अधिकार दाखवीत. त्या हट्टी असल्याने बापूंना विचार व कार्य गळी उतरविणे कठीण जात असे. पण गांधीजींनी कधी हार माणली नाही आणि प्रयत्न पण सोडला नाही. याचा परिणाम असा झाला की बा घडायला लागल्या. समजायला लागल्या. त्या बापूंच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालायला लागल्या. बापूंनी जे कार्य हाती घेतले त्या कामात बां चे योगदान होते. मी जे कार्य करू शकलो जीवनात यशस्वी झालो ते बा च्या सहकार्यामुळेच असे गांधीजींने म्हटले आहे.गांधीजींचे जीवन,विचार, कार्य समाज, राष्ट्र व मानवतेसाठी होते. तत्वावर व समानतेवर आधारित बापू जीवन जगत होते. एवढेच नाही तर या साठी देश स्वातंत्र्य लढ्यासाठी ३० एप्रिल १९३६ मध्ये बापू सेवाग्राम या गावी आले. आश्रमची स्थापना करण्यात आली. त्या वेळी त्यांच्या सोबत बा, बलवंत सिंग, मुन्नालाल शाह, अब्दुल गफ्फार खाँ, मीराबहन इ.होते. आश्रमीय जीवन पध्दती अंगिकारल्याने स्वतंत्र व व्यक्तिगत असे काहीच नव्हते. अशाही परिस्थितीत त्यांनी बापूंना साथ दिली हे महत्वाचे.प्रात:प्रार्थना, श्रमदान, रसोडा, वाचन, सूतकताई, सायं.प्रार्थना, सण, ऊत्सव, आश्रमातील अतिथी विशेषता महिला व मुलींची जबाबदारी बा कडेच असायची. त्या सुध्दा तेवढेच मायेने सर्वांची काळजी घेत असे. आश्रमात रामायन,गीता,काही पत्रिकांचे त्या नियमित वाचन करी.बिनोबांनी त्यांना बारावा अध्याय शिकविला होता.संत तुकाराम, संत नामदेव, रामकृष्ण परमहंस या महापुरूषांनी आपल्या पत्नीला जे स्थान दिले होते तेच स्थान बापूंनी बा ला दिले होते. ब्रम्हचर्य अंगिकारल्यानंतर बापू कस्तुरबांना बा म्हणत. त्यांनी हे मैत्रीचे नवे नाते निर्माण केले आणि अखेरपर्यंत प्राणपणाने जपले. आश्रमात येणारे राष्ट्रीय स्तरावरील नेते बा ना आवर्जून भेटत चर्चा करीत असे. यात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजनी नायडू, राजेंद्र प्रसाद इ.सह अन्य नेते मंडळीचा समावेश होता.१९४२ चा ठराव आदिनिवास मध्ये झाला. करा व मरा चा नारा देशवासियांना दिला. मुंबईतील गोवालिया टँकवर ९ आॅगष्ट १९४२ ला सत्याग्रह सभा ठरली. ५आँगष्ट रोजी बा बापूसोबत मुंबईसाठी रवाना झाल्या. जाण्याअगोदर त्यांनी आश्रमात बकुळीचे झाड लावले होते. सभेअगोदरच बापूसह अन्य नेत्यांना सरकारने अटक केली. सभेला कस्तुरबांनी संबोधित केले. ऊर्जा निर्माण करून आंदोलनाची धार वाढविली. बांना अटक करून आगाखाँ पॅलेसमध्ये ठेवण्यात आले. तिथे त्यांची तब्बेत बिघडली. बापूंनी सेवा केली पण यश आले नाही. अखेर २२ फेब्रुवारी १९४४ रोजी त्यांचे निधन झाले.कस्तुरबांचे आश्रमातील बा कुटीत सहा वर्षांचे वास्तव्य राहिले आहे. त्यांचे साहित्य जपून ठेवण्यात आले आहे. दर वर्षी मातृदिनी त्यांनी लावलेल्या बकुळीच्या झाडाखाली सभा घेऊन त्यांचे स्मरण केले जाते.