शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

आजचा व्यवहार कालच्या तारखेत

By admin | Published: July 02, 2017 1:12 AM

देशात १ जुलैच्या मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला. एक देश एक कर ही पद्धत लागू झाल्यानंतर

जीएसटीचा पहिला दिवस : बाजारात स्थिती साधारणच; समज-गैरसमजाचा गोंधळ लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : देशात १ जुलैच्या मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला. एक देश एक कर ही पद्धत लागू झाल्यानंतर बाजारात शनिवारी परिस्थिती मात्र साधारणच होती. सध्या येथील व्यावसायिकांकडून जुन्याच वस्तूंची विक्री होत असल्याने सध्या जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली नसल्याचे दिसून आले आहे. तर काहींकडून आज कालच्याच तारखेत व्यवहार केल्याची कबुली दिली. जीसटी लागू करण्याचा निर्णय झाला त्या काळापासूनच या करासंदर्भात अनेक समज गैरसमज पसरत गेले. या संदर्भात आताचा सेवा व वस्तू कर आणि पूर्वीचा विक्रीकर विभागाच्यावतीने नागरिकांत जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नादरम्यान या करासंबंधात मोठ्या प्रमाणात समज-गैरसमज निर्माण झाले होते. असे असले तरी सर्वसामान्यांना यात लाभ होणार असे म्हणत शासनाने या कराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. काही व्यापाऱ्यांकडून या कराचा राज्य स्तरावर विरोध करण्यात येत आहे. असे असले तरी त्याची अंमलबजावणी करणे आता सक्तीचे झाले आहे. जीएसटीची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयामुळे बाजारात काही प्रमाणात फरक पडेल असे वाटत असताना वर्धेत मात्र स्थिती सर्वसाधारण असल्याचे दिसून आले आहे. येथील व्यापाऱ्यांकडून आज जुन्याच पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसून आले. यात सर्वाधिक परिणाम औषधी विक्रेत्यांकडून कालच्या तारखेत आजचे काम सुरू असल्याचे दिसून आले. कपडा व्यापाऱ्यांकडूनही आज जुन्याच पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसून आले. ज्या प्रमाणात जीएसटीची चर्चा झाली त्या प्रमाणात त्याचा विशेष परिणाम बाजारात दिसून आला नाही. मात्र या करामुळे सेल बंद झाल्याचे दिसून आले. नोंदणीकरिता तीन महिन्यांचा वाढीव कालावधी देशात १ जुलैपासून जीएसटी लागू करण्यात आला आहे. या तारखेच्या आत सर्वच कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांनी जीसटी क्रमांक घेणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र नित्याप्रमाणे शासनाची वेबसाईट कामाच्या वेळी जाम होत असल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. यात अनेकांची नोंदणी रखडली होती. या व्यापाऱ्यांकडून आणखी तीन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या काळात नोंदणीपासून वंचित राहणाऱ्या व्यापाऱ्यांनी नोंदणी होणे अनिवार्य आहे. विक्रीकर कार्यालय झाले वस्तू व सेवा कर कार्यालय आतापर्यंत विक्रीकरण कार्यालय म्हणून कार्यालय कार्यरत असलेले विक्रीकर कार्यालयाचे आजपासून नाव बदलले आहे. आता हे कार्यालय वस्तू व सेवा कर कार्यालयाच्यावतीने ओळखले जाणार आहे. तसे नामकरण करून त्याचे रितसर लोकार्पण राज्य सहायक राज्यकर आयुक्त दामले यांच्या हस्ते करण्यात आले. विमा एजंटांकडून निदर्शने येथील भातीय जीवन विमा निगमच्या काही एजंटांकडून कार्यालयाच्या परिसरात विम्यावर आकारण्यात येत असलेल्या जीएसटीचा विरोध दर्शवित निदर्शने केली. विशेष म्हणजे या निदर्शनात काहीच एजंट समाविष्ट असल्याचे दिसून आले. १५ करांऐवजी एकच कर केंद्र आणि राज्य शासनाचे वस्तू आणि सेवा संबंधित अप्रत्यक्ष कर एकत्रित कर एकत्रित केले जातील. केंद्रीय उत्पादन शुल्क (सेंटर एक्सीस ड्युटी), अतिरिक्त उत्पादन शुल्क (अ‍ॅडीशनल ड्युटी आॅफ एक्सीस), सेवाकर (सर्व्हीस टॅक्स), अतिरिक्त सीमा शुल्क (अ‍ॅडीशनल ड्युटी आॅफ आय.इ.सीवीडी), विशेष अतिरिक्त सीमा शुल्क (एसएडी), अधिभार आणि सेस केंद्र शासनाचे अप्रत्यक्ष कर आहेत. तर मुल्यवर्धित कर (वॅट), केंद्रीय विक्री कर (सीएसटी), करमणूक कर, ऐषआराम कर, लॉटरी कर, ऊस खरेदी कर, प्रवेश कर, स्थानिक संस्था कर, जकात हे राज्य शासनाचे अप्रत्यक्ष कर आहेत. हे सर्व कर जीएसटीमध्ये अंतर्भूत करण्यात येतील. यामुळे नागरिकांची या सर्वच करांतून सुटाका होणार असल्याचे वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.