शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

शेतकरी तोडणार शहरांची रसद ! १ जूनपासून बळीराजाचा जम्मू-काश्मीरपासून केरळपर्यंत एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 5:56 AM

गतवर्षी महाराष्ट्रात झालेला शेतकरी संप आता देशव्यापी करण्याचा निर्णय बुधवारी सेवाग्राम येथे झालेल्या राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला.

सेवाग्राम (वर्धा) - गतवर्षी महाराष्ट्रात झालेला शेतकरी संप आता देशव्यापी करण्याचा निर्णय बुधवारी सेवाग्राम येथे झालेल्या राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. २२ राज्यांतील शेतकरी १ ते १० जून या काळात संपावर जाणार असून १२८ शहरांत भाजीपाला, अन्नधान्य, दूध व इतर शेतमालाचा पुरवठा बंद ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी देशभरातील ११० शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन राष्टÑीय किसान महासंघाची स्थापना केली आहे. या महासंघाने संपाची हाक दिली. आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी बुधवारी वर्धा येथे महासंघाची देशव्यापी बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाच्या कोअर कमिटीचे सदस्य संदीपआबा गिड्डे पाटील होते. या बैठकीला शिवकुमार शर्मा, गुरजाम चंढूणी, डॉ. बुधाजीराव मुळीक, संतबीर सिंग, सुरेश कौच, राजकुमार गुप्ता, रणजीत राजू, महेश सिंग, अभिमन्यू कोहाड, लक्ष्मण बंगे, श्रीकांत तराळ, के.बी. बिजू, प्रदीप नागपूरकर, कमल सावंत, शंकर दरेकर, सतीश कानवडे, विजय काकडे, राजू झेबीयर, प्रदीप बिलोरे यांच्यासह २२ राज्यांतून १३० प्रतिनिधी उपस्थित होते.नेमके काय असेल आंदोलनाचे स्वरूप?२२ राज्यातील १२८ शहरांमध्ये हा संप होणार असून यात नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे या शहरांचा समावेश आहे. या संपादरम्यान शेतकरी आपला शेतमाल, दूध, भाजीपाला शहरांमध्ये विक्रीस पाठविणार नाहीत. तसेच शहरातील कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणार नाहीत.कोणत्याही शेतमालाचे नुकसान होणार नाही याची पूर्ण खबरदारी राष्ट्रीय किसान महासंघ घेत असून केवळ ठरलेली शहरे वगळून इतर शहरे व गावांत शेतमाल विक्री करता येणार आहे.हे संपूर्ण आंदोलन अंहिसेच्या मार्गानेच केले जाणार आहे. सरकारने याबाबत काही वेगळी भूमिका घेतली तर निर्माण होणाºया परिस्थितीला सरकारच जबाबदार राहिल, असे महासंघाच्या कोअर कमिटीचे सदस्य संदीपआबा गिड्डे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शेतकºयांना जे काही मागायचे आहे, ते कायद्याने मागायचे आहे. कायदा संमत होणे आवश्यक आहे. हीच भूमिका आपण राष्टÑीय परिषदेत मांडली. जगातील अनेक देशांत अस्मानी, सुलतानी संकटे येतात; पण त्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंटचे कायदे आहेत. भारतातही शेतीसाठी असा कायदा संमत होणे गरजेचे आहे.- डॉ. बुधाजीराव मुळीक, शेतीतज्ज्ञ व सदस्य, महाराष्टÑ कोअर कमिटी.असे आहेत टप्पे५ जून : केंद्र शासनाचा धिक्कार दिवस६ जून : मंदसौर (मध्यप्रदेश) येथे गतवर्षी गोळीबारामध्ये मृत्यू पावलेल्या शेतकºयांसाठी श्रद्धांजली सभा व शेतकरी विरोधी शासन व्यवस्थेचे श्राद्ध८ जून : असहकार आंदोलन९ जून : सामूदायिक उपोषण१० जून : भारत बंदप्रमुख मागण्या काय आहेत?-खतांचे अनुदान थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करा. सरसकट शेतकºयांचा सातबारा कोरा करा- सेंद्रिय शेतीसाठी एकरी ८ हजारांचे अनुदान द्या. उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्या- गोहत्या बंदी कायदा मागे घ्या- गाईच्या दुधाला १०० तरम्हशीच्या दुधाला ८० रुपये भाव द्या

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीStrikeसंपIndiaभारत