शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

सेवाग्राम आश्रमात पारंपरिक गुढीपाडवा साजरा

By admin | Published: April 10, 2016 2:30 AM

आश्रम परिसरात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. शेतात वखर करून आणि विविध भजनांच्या माध्यमातून हा सण साजरा करण्यात आला.

शेतात वखर करून प्रारंभ : बैलांना सजवून केली विश्वसुखाची प्रार्थनासेवाग्राम : आश्रम परिसरात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. शेतात वखर करून आणि विविध भजनांच्या माध्यमातून हा सण साजरा करण्यात आला.याप्रसंगी मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र गुढीपाडवा उत्साहात साजरा करतात. मराठी नववर्षाची आणि शेतीच्या सर्व व्यवहाराची सुरुवात या दिवसापासून होते. कृषीसंस्कृती व परंपरा एकमेकांशी जुळल्या आहेत. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, पण आज त्याचीच अवस्था हलाखीची झाली आहे. ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो’ असे पूर्वापार म्हटले जाते. त्यामुळे खरोखरीच बळीराजाचे राज्य येण्याची गरज यावेळी जाधव यांनी व्यक्त केली. जालंधरनाथ यांनीही सर्वांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. आश्रमच्या शेतात सजविलेल्या बैलांची विधीवत पूजा केल्यानंतर शेतकरी गवईने वखरनी केली. सिद्धेश्वर उंबरकर, महादेव लोखंडे, निलेश आळणकर, शेरखा पठाण यांनी भजने गायली. यावेळी सा.स.सं.चे मंत्री प्रसाद, भावेष चव्हाण, अशोक गिरी, नामदेव ढोले, बाबा खैरकर, सुशिल फत्तेपुरिया, शोभा तायडे, मालती देशमुख, गिरजा मगर, प्रभा गवई, वैशाली बारई, सुमन नाईक, चंद्रकला पाटील, रूपाली उगले, ममता ठाकरे, जयश्री पाटील, संगिता चव्हाण, माधुरी भोगे, सदामून, कीर्ती कार्डेकर, अंकुश गोडघाटे उपस्थित होते. संचालन विजय धुमाळे यांनी केले. गर्जना संघटनेद्वारे गुढीपाडवा उत्सववर्धा : गर्जन संघटनेतर्फे शितला माता मंदिर परिसरात मराठी नववर्षा निमित्त भव्य गुढी उभारण्यात आली. तसेच शितला माता मंदिरात घट स्थापना करण्यात आली. या नऊ दिवसात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शितला माता मंदिरात १७ एप्रिल रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. गुढी उभारताना संघटनेचे अध्यक्ष महेश ठाकूर, प्रशांत नागतोडे, प्रमोद कोल्हे, दीपक आडेपवार, मंगेश साठे, गुड्डू गावंडे, विनोद सलामे, महेश कडवे, सुरेश तलमले, रवी मुडे, बालु पत्रे, बबलु शाहू, चिंटु माहुले, मिलिंद पाटी, महेश शेंद्रे, सचिन सरमाके, खडसे, रवी जांभुळकर, लल्लू चौबे, मोहन चौधरी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)