शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
2
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
3
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
4
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
5
Jasprit Bumrah नंबर वन! एक विकेट घेताच नावे झाला खास विक्रम; अश्विनला टाकलं मागे
6
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
7
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
8
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
9
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
10
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
11
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
12
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
13
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
14
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?
15
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
16
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
18
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
19
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
20
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 

राज्य मार्गावर वाहतूक धोक्याची

By admin | Published: May 08, 2017 12:38 AM

सर्वाधिक रहदारीचा भार असलेले राज्यमार्ग सुस्थितीत असणे गरजेचे असते. सुस्थितीत म्हणजे केवळ रस्ता गुळगुळीत असून चालत नाही

झुडपे, दुकानांचे अतिक्रमण : बांधकाम विभागाची डोळेझाक लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सर्वाधिक रहदारीचा भार असलेले राज्यमार्ग सुस्थितीत असणे गरजेचे असते. सुस्थितीत म्हणजे केवळ रस्ता गुळगुळीत असून चालत नाही तर रस्त्याच्या कडेला असलेली झुडपे कापलेली असणे तथा वाहने, दुकानांचे अतिक्रमण हटविणे गरजेचे असते; पण वर्धा ते यवतमाळ राज्य मार्गावर झुडपांसह वाहनांचेही अनेक ठिकाणी अतिक्रमण दिसते. यामुळे वाहतूक धोक्याची ठरत आहे. वर्धा ते यवतमाळ राज्य मार्गावर सेलसुरा गावाजवळ रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढलेली आहे. रस्त्यापर्यंत असलेल्या या झुडपांमुळे वाहने रस्त्याच्या काठाने चालविणे धोक्याचे ठरत आहे. याच मार्गावर सेलसुरा ते सालोड दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहने उभी असतात. या वाहनांमुळे चालकांना सावधगिरी बाळगूनच आपली वाहने काढावी लागतात. शिवाय अनेक ठिकाणी रस्त्यापर्यंत दुकाने, घरे आहेत. सालोड येथे रस्त्यापर्यंत दुकाने असल्याने अपघाताचा धोका असतो. शिवाय प्रवासी निवारा, आॅटो स्टॅण्ड, नागरिकांची घरेही रस्त्यापर्यंत आहेत. यामुळे हा रस्ता वाहतुकीस अपुरा ठरत आहे. याच प्रकारामुळे सालोड ते सेलसुरा दरम्यान अनेकदा मोठे अपघात झाले आहेत. यात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. या प्रकाराकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून ही बाब प्रवाशांच्या जीवावर बेतणारी ठरत आहे. सालोड बायपास चौकातील रस्ता दुभाजक झाले रस्त्याला समांतर नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली असता बायपास चौकांमध्ये रस्ता दुभाजकांची निर्मिती करण्यात आली होती. हे रस्ता दुभाजक अत्यंत ठेंगणे केल्याने त्यांची मोडतोड झाली आहे. वर्धा शहरातील दत्तपूर चौक, जुनापाणी चौक, सावंगी चौक तसेच सालोड चौकातील रस्ता दुभाजकही अत्यंत ठेगणे व मोडकळीस आलेले आहेत. सालोड चौकातील रस्ता दुभाजक तर वारंवार रस्ता दुरूस्तीमुळे रस्त्याला समांतरच झाल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी या दुभाजकांची रंगरंगोटी कण्यात आली होती; पण सध्या दुभाजकांची दयनिय अवस्था झाली आहे. सालोड चौकातून सर्वाधिक अवजड वाहनांची वाहतूक होते. यामुळे या चौकात सुशोभित केलेले, रिफ्लेक्टर लावलेल्या उंच दुभाजकांची गरज आहे; पण या दृष्टिने प्रयत्न होत नसल्याचेच दिसून येत आहे. वाहनांमुळे अपघाताची शक्यता वर्धा ते यवतमाळ मार्गावरील देवळी ते वर्धा दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी केली जातात. हा प्रकार सेलसुरा ते सावंगी दरम्यान अधिक पाहावयास मिळतो. सालोड बायपास चौकामध्येही मोठी वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम प्रस्तावित आहे. असे असले तरी किमान रस्ता पूर्ण होईस्तोवर या प्रकारांवर आळा घालणे गरजेचे झाले आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. बांधकाम विभाग व पोलिसांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.