आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर नादुरुस्त ट्रकमुळे लागल्या वाहनांच्या लांब रांगालोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक ट्रक बंद पडला. परिणामी, वर्धेकडून यवतमाळ व हिंगणघाटकडे जाणाऱ्या तसेच यवतमाळ व हिंगणघाटकडून वर्धा शहरात येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकूणच बंद पडलेल्या ट्रकमुळे आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक पोलिसांनी अर्धा तास प्रयत्न करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.उड्डाण पुलावर अचानक ट्रक बंद पडल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती ते बसस्थानक, बजाज चौक ते महावितरणचे बोरगाव (मेघे) येथील कार्यालय तसेच कृषी उत्पन्न बाजार समीती ते स्टेशनफैल भागातील रेल्वे स्टेशनचे मुख्य द्वारपर्यंत छोट्या, मोठ्या व जड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुल आवागमनासाठी लहान पडत असल्याने त्यांच्या रुंदीरकणाचे काम सध्या सुरू आहे. परंतु, होत असलेले काम कासवगतीनेच सुरू असल्याची शहर परिसरात ओरड आहे. कासवगतीने होत असलेले काम युद्धपातळीवर पुर्ण करावे, अशी वाहनचालकांसह शहरातील नागरिकांची मागणी आहे. सोमवारी दुपारी वाहतूक पोलिसांनी चांगलीच माथापच्छी करून उड्डाण पुलावरील खोळंबलेले वाहतूक सुरळीत करावी लागली.रुंदीकरणाचे कामही कासवगतीनेबजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुल वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे नागरिकांच्या आवागमनासाठी लहान पडतो. त्यामुळे शासनाने उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. परंतु, रुंदीकरणाचे कामही कासवगतीने होत असल्याची ओरड आहे. परिणामी, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
उड्डाण पुलावर वाहतुकीचा खोळंबा
By admin | Published: May 09, 2017 1:09 AM