शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

रस्त्यात ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प

By admin | Published: April 14, 2016 2:49 AM

येथील आर्वी मार्गावर असलेल्या पुलाचे काम अर्धवट असल्याने येथे बुधवारी सकाळी रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणारा ट्रक फसला.

दोन महिन्यांपासून पुलाचे काम थंडबस्त्यात : रस्त्यातच ट्रक रिकामा केल्याने अनेकांचे अपघातवर्धा : येथील आर्वी मार्गावर असलेल्या पुलाचे काम अर्धवट असल्याने येथे बुधवारी सकाळी रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणारा ट्रक फसला. ट्रक रस्त्याच्या मधोमध फसल्याने दोनही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्याकरिता ट्रकमधील रेती रस्त्याच्या मधोमध रिकामी करण्यात आली. त्यावर घसरून पडल्याने येथे अनेकांना किरकोळ इजा झाली. आर्वी मार्गावरील फरसाचा नाला म्हणून ओळख असलेल्या नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव आमदार विकास निधीतून मंजूर करण्यात आला. या कामाचे बांधकाम सार्वजनिक विभागाच्या अधिकारात देण्यात आले. बांधकामाचा निधी मंजूर झाल्याने आमदारांच्या हस्ते दीड महिन्यापूर्वी कामाचे भूमिपूजन करण्यात आले. पुलाचे एका बाजूचे खोदकाम करण्यात आले. याला आता दीड महिन्याचा कालावधी झाला. या खोदकामाव्यतिरिक्त पुलाचे दुसरे कुठलेही काम करण्यात आलेले नाही. हा रस्ता वर्दळीचा असल्याने झालेल्या खोदकामामुळे अपघाताची शक्यता वर्तविण्यात आली असताना बुधवारी सकाळी येथे रेती भरला ट्रक फसला. रस्त्याच्या मधोमध ट्रक फसल्याने दोनही बाजुच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. याची माहिती रामनगर पोलिसांना देताच ठाणेदार विजय मगर त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. यावेळी ट्रकचालकाकडून रेतीची रॉयल्टी तपासली असता त्यात दोन ब्रास रेतीची वाहतूक करण्याचा परवाना देण्यात आल्याचे दिसून आले. मात्र ट्रकमध्ये त्यापेक्षा अधिक रेती असल्याचे ठाणेदार विजय मगर यांनी सांगितले. याची माहिती त्यांनी तहसीलदार राहुल सारंग यांना दिली. यानंतर ट्रकमधील रेती तिथेच खाली करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र रस्त्यावरच ट्रक खाली केल्याने त्यावरून घसरून अनेक जण किरकोळ जखमी झाले. या पुलाखालून दुरध्वनीच्या विविध कंपनीच्या लाईन गेल्या आहेत. त्याची कल्पना संबंधीत कंपनीला देण्यात आली असली तरी त्यांच्याकडून कारवाई झाली नसल्याने काम करण्याची अडचण जात आहे.(प्रतिनिधी)